रेल्वे अपघातात जखमी झालेल्या लहान मुलास तत्काल रुग्णालयात दाखल करून वांद्रे पोलीसांनी वाचविले प्राण…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

वांद्रे: दिनांक 06-01-2023 रोजी वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे नेमणूकीचे पो.शि. 583 चेतन कल्याणसिंग ताटू हे वांद्रे रेल्वे स्टेशन येथे दिवसपाळी स्टेशन ड्युटी कर्तव्यकामी हजर असताना त्यांना स्टेशन मास्तर बांद्रा रेल्वे यांनी 12.22 वा.चे सुमा. दिलेल्या माहितीवरून ते वांद्रे रेल्वे स्टेशन ते माहीम रेल्वे स्टेशन कि.मी. नं.14/08 ते 14/09 चे मध्ये रेल्वे ट्रॅक मध्ये अपघाताच्या ठिकाणी तात्काळ पोहचले.

त्याठिकाणी पोचले असता एक अंदाजे 12 वर्षाचा लहान मुलगा रेल्वे अपघातात जखमी होऊन पडल्याचे दिसले, सदर जखमी मुलाचा डावा पाय तुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत पडलेला दिसला,सदर अंमलदार यांनी परिस्तिथी पाहून क्षणाचा ही विलंब न करता सदर जखमी मुलास स्वतःच्या हातावर उचलून इतर स्टाफसह रेल्वे ट्रॅक मधून चालत वांद्रे रेल्वे स्टेशन येथील ॲम्बुलन्सने तत्काळ जखमी मुलास घेऊन भाभा रुग्णालय येथे रवाना केले व तेथे 12.30 वा.चे सुमा.पोहचून उपचार कामी तेथील ऑनड्युटी डॉक्टरासमोर नेले, डॉक्टरांनी सदर जखमी मुलावर तात्काळ उपचार सुरू करून त्यास अतिदक्षता विभागात दाखल केले.

जखमी मुलास तात्काळ कमी वेळेत उपचार कामी आणले त्यामुळे त्याचेवर उपचार सुरू करता आले व वेळेत उपचार मिळाल्याने जखमी मुलाचे प्राण वाचु शकले आहेत असे डॉक्टरांनी सांगितले सदर जखमी मुलाचे नाव कु. फरहान कमरू मास्तर अन्सारी,वय 12 वर्ष, राहणार धारावी,मुंबई असे असून त्याचे वडील श्री.कमरूमास्तर अन्सारी हे नमूद रुग्णालयात सुश्रुषा करिता उपस्थित झाले त्यांनी ही रेल्वे पोलिसांनी वेळेत त्यांचे मुलास उपचार कामी दवाखान्यात आणले म्हणून तो सुखरुप आहे असे मनोगत व्यक्त करून रेल्वे पोलिसांचें आभार मानले आहेत.

तरी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.शि.583 चेतन कल्याण सिंग ताटू यांनी कर्तव्यनिष्ठता व प्रसंगवधान दाखवून जखमी मुलास तत्काळ त्यांच्या स्वतःच्या हातावर उचलून ट्रॅक मधून चालत येऊन उपचारकामी रुग्णालयात दाखल केले त्यामुळे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविले आहेत व अतिशय उल्लेखनीय अशी चांगली कामगिरी केली आहे अशी माहिती श्री. एच टी कुंभार व.पो.नी .वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट