पालघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या भगिनींनी केला रक्षाबंधन साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:

एक राखी अशीही जी
सदैव रक्षण करणारी…!
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

“ना जातीसाठी ना पातीसाठी प्रत्येक दिवस पोलीसांसाठी”…!
24 तास कर्तव्यदक्ष पोलीस आपलं घर परिवार सोडून आपलं कर्तव्य बजावत ड्युटी करत असतात तसेच सदैव आपल्या जीवाची परवा न करता असंख्य बहिणीचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.







महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राहुल दुबाले साहेब तसेच महाराष्ट्र राज्य सचिव मा श्री.योगेश कदम साहेब व मुंबई/ पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाने पालघर जिल्हा टीमच्या वतीने पालघर जिल्हा उपाध्यक्ष सौ.शितल ताई प्रमोद उईके व त्यांची टीम यांनी आज रक्षाबंधन सन:च्या निमित्ताने कर्तव्यदक्ष पोलिस भावाला राखी🏵️ बांधून सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आले, उपस्थित मान्यवर महाराष्ट्र पोलीस संघटनाचे पालघर जिल्हा सल्लागार श्री.संजय राऊत साहेब तसेच पालघर तालुका संघटक श्री.अमोल गायकवाड साहेब व पालघर तालुका अध्यक्ष श्री.संदेश मोरे साहेब तसेच पालघर तालुका सचिव श्री.किरण पाटील साहेब,श्री.पंकज मंडल व पालघर जिल्ह्यातील टीम सर्वांचे मनापासून धन्यवाद मानण्यात आले.




अशी माहिती श्री.मंगेश उईके महासचिव पालघर जिल्हा
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र.राज्य आणि
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com