सर जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई यानी बस मध्ये मोबाईल व पर्स चोरी करणारे ५ सराईत आरोपीतांना अटक करून ५३ मोबाईल केले हस्तगत..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

मुंबई :

 सर जे जे मार्ग पोलीस ठाणे च्या हददीत दिनांक ०१/०३/२०२५ रोजी फियार्दी नामे संदेश ठकसेन भुजबळ, वय ४५ वर्षे हे भायखळा ते भेंडीबाजार जंक्शन, पायधुनी, मुंबई दरम्यान बस ने प्रवास करीत असतांना बस मध्ये काही अज्ञात इसमांनी त्यांचा पॅन्ट च्या खिशात ठेवलेला रेडमी नोट १३ मोबाईल फोन लबाडीच्या इरादयाने चोरी केला म्हणून सर जे जे मार्ग पोलीस ठाणेस गु.र.क्र. ९७/२०२५ कलम ३०३ (२) भान्या स. अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक प्रशांत नेरकर यांनी तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्यांचे पथकासह सलग ०७ ते ०८ दिवस वेशांतर करून गोवंडी ते कुलाबा बसमध्ये प्रवास करून आरोपीचा शोध घेतला व दि ११/०३/२०२५ रोजी बसमध्ये चोरी करणारे ०५ आरोपीतांना बेगनवाडी, गोवंडी, मुंबई येथे बस स्टॉप वर सापळा लावून बसमध्ये चढतांना शिताफीने पकडले व चौकशी दस्यान त्यांचे कडून वेगवेगळ्या कंपन्याचे एकून ५३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये सर जे जे मार्ग पोलीस ठाणेचे मोबाईल चोरी व पर्स चोरीचे ०५ गुन्हे व इतर पोलीस ठाणेचे ०३ गुन्हे असे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

तसेच नमुद आरोपीतांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, येथे देखील चोरी केल्याची कबूली दिली आहे.

अटक आरोपी माहिती.

१) अब्दुल कयुम अन्सार उर्फ दरभंगा, वय ५९ वर्षे, धंदा नाही, रा.ठि रूम न. ६५५, अग्रवाल वाडी, शेख मिस्त्री दर्गा रोड, अॅण्टाप हिल, मुंबई. २) हसन मोहम्मद हुसेन शेख उर्फ व्हिटी, वय ५८ वर्षे, धंदा- नाही. रा.ठी- मदसरसा हुसेनीया जवळ, बेगनवाडी, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई. ३) मोहमद वकील ईदउहक शेख, वय ३४ वर्षे, रा.ठी. रूम न. ३३२, गल्ली न. ०१ रोड न. ०१, पी ए लोखंडे मार्ग, गौतमनगर, गोवडी, ४) सिकंदर अन्वर शेख, वय ३४ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा.ठी -रूम न. ९२, गल्ली न. ०७ साईबाबा मंदिराजवळ, रफीक नगर, गोवंडी, मुंबई. ५) मोहमद शोहेब मुक्तार शेख, वय ३२ वर्षे, धंदा नाही, झोपडा न. १२, माता मंदिर कॉलनी, बनील गाव, टिटवाळा, ई. कल्याण, ठाणे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त का व सु श्री. सत्य नारायन चौधरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग डॉ. अभिनव देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री डॉ. प्रविण मुंढे, मा. सहायक पोलीस आयुक्त डोंगरी विभाग तनवीर शेख, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुकूंदा वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रशांत नेरकर (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी) पो ह. नियाजुददीन तडवी, पो. ह. सचिन पाटील, पो.शि. मंदार घाडगे, पो.शि. प्रविण शेवरे, पो.शि. दिपक डावरे, पो.शि. ब्रम्हदेव कोलपूसे, यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट