सिंहगड रोड पोलीसानी रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व तीन जिवंत काडतुस केले जप्त

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
दि.२४/०३/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार सचिन निकम, संतोष भांडवलकर, तारु, ओलेकर, मोहिते, गणेश झगडे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, विनायक मोहीते यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की,
सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे खंडु म्हेत्रे याचेकडे गावठी पिस्टल असुन तो हिंगणे येथील शशीतारा प्रतिष्ठान ऑफीसचे मागील मोकळ्या जागेत थांबलेला आहे अशी बातमी मिळाली असता लागलीच त्यांनी सदरची बामती सोबतचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता, त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे मुखजल आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी वरील स्टाफ सह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता पोलीस रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी खंडु म्हेजे हा सदर ठिकाणी बसलेला असल्याचे दिसला त्यास स्टाफचे मदतीने पकडुन नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता खंडु ऊर्फ पेंडी मारुती म्हेत्रे वय २२ वर्षे रा.प्लॅट नं १२ शिवकृष्ण अपार्टमेंट हॅप्पी कॉलनी वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे असे असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी थांबण्याचे व आम्हांस पाहुन घाई घाईने निघुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांने आम्हांस उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही लागलीच त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ४०,०००/-रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व ३,०००/- रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६३/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१), १३५,१४२ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.
तसेच दिनांक दि.२४/०३/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश झगडे यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे शुभम सचिन ऊफाळे रा. साईनगर, हिंगणे खुर्द, पुणे हा त्याचे राहते घरी आला असलेबाबत माहिती मिळाली सदरची बातमी सोबतचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता, त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे मुखजल आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी तपास पथकाचे अधिकरी व अंमलदार यांनी बातमीची खात्री करुन त्याचे राहते घराजवळ जावून छापा कारवाई करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६२/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा संजय शिंदे हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, अमोल पाटील, गणेश झगडे, विनायक मोहीते, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, निलेश मोरडे यांचे पथकाने केली आहे.