सिंहगड कॉलेज परीसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणा-या आरोपीस भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दिनांक ०८/०४/२०२५ रोजी सकाळी ०५/३० वा. चे सुमारास चंद्रागण कॅपिटल या इमारतीचे मुख्य इमारतीचे गेटजवळ, लॉ कॉलेज रोडवर, सिंहगड कॅम्पस, पुणे या ठिकाणी फिर्यादी चहा पिण्यासाठी थांबले असताना आरोपी तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव या दोघांनी मिळून फिर्यादी यांना भांडणांच्या रागातुन त्यांचेकडील हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले आहे. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव यांचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २०३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ११८(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयामध्ये आरोपीतांचा शोध घेवुन त्यामध्ये आरोपी तन्मय सखाराम भुयारी, २० वर्षे, रा. सध्या सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे मुळ रा. बुलढाणा यास दिनांक १२/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी सिंहगड कॉलेजवर फिर्यादी यांचेवर लोखंडी हत्याराने वार करुन दहशत पसरविल्याने सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिंहगड कॉलेजमधील शिक्षण घेणारे विद्यार्थीच्या दहशती पासुन भय मुक्त होणे करता व सिंहगड कॉलेज आवारामध्ये विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांमध्ये दहशत निर्माण होवुन सिंहगड कॉलेज मध्ये शांततेचे वातावरण निर्माण व्हावे या करता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपीने ज्या ठिकाणी फिर्यादी यांचेवर हत्याराने वार करुन जखमी केले होते त्या भागात आरोपीस घेवुन जावुन त्या ठिकाणा वरील नागरीकांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भयमुक्त केले आहे.

सदरची कामगिरी माः अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सपोनि समीर कदम, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, व पोलीस स्टाफ ने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट