सिध्देश्वर यात्रेच्या खाजगी करण विरोधी पुर्व भाग कृती समितीच्या जन आंदोलनाला खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याची पडद्या मागुनच्या बातमीला लागली मिर्ची..

लातुर
सह संपादक- रणजित मस्के


खासदार साहेबांनी दिलेल्या पत्रकात कोणालाही बदनाम करण्याचा किंवा राजकीय डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला आहे.असे पत्र वाचल्यानंतर कोणत्याही साक्षर मानसाला समजते.?
ज्या पूर्व भागात भागात 200 रुपये पासून जास्तीत जास्त 1200 रुपये हाजरीने कष्ट करणारे नागरिक राहतात.त्यात रोज काम लागतेच म्हणून हमखास सांगता येत नाही.या भागातील सर्वच नागरिकांना प्रत्यकी 40 ते 50 रुपये शुल्क देऊन यात्रा महोत्सवात सहभागी होणे शक्य नाही..मग मग काय यात्रेत सहभागी व्हायचे नाही का.?हा विषय घेऊन लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने निवेदने देत पाठपुरावा केल्यानंतर 20 रुपये शुल्क आकारले जात आहे.वर्षातून एकदा येणाऱ्या यात्रा पाहण्यासाठीचे शुल्क म्हणजे यात्रा महोत्सवास व्यवसायीक व जाचकपणाचे रूप प्राप्त होतानाचे दिसून येत आहे.हा विषय लोकप्रतिनिधी कडे मांडला तो वास्तविकता आहे..म्हणुण लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार साहेबांनी ते पत्र दिले आहे.मुळात या विषयी बोलायच म्हंटले तर खुला जनता दरबार आयोजित करण्याचे आवाहन समितीने दिले आहे या पत्रात फक्त यात्रेचे बदलले स्वरुप पुर्व पदावर यावे हीच मुख्य मागणी आहे.सर्व लातुरकरांनी यावर प्रतक्ष प्रतक्ष पाठींबा देत आहेत.
कोणाचाही नामोल्लेख कुठेही केला नसताना विनाकारण धार्मिक व गोरगरीब यात्रेकरुंना बसणारी आर्थिक झळ कमी करण्यासाठी खासदारांनी हा प्रयत्न केला आहे. म्हणजे राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारण केल्या शिवाय लातुरात कोणताही कार्यक्रम होऊ द्यायचा नाही का.?*
सदरचा पाठपुरावा करताना जोडले गेलेले लक्ष्मीमण जाग्याप ,ऋषिकेश रेड्डी,नितीन चालक,यांनी सदरच्या पत्रकारांस गडीच्या विरोधात बातमी देण्याची सुपारी घेऊन काम करणाऱ्या लिफाफा पत्रकाराला गाडीचा आश्रय नसल्याने पडद्यामागचा पडदा उचलणारा मीच पत्रकार म्हणून टेबी मिरवतो याची यात्रेतील खाजगीकरण कंत्राटदारा सोबत भागीदारी असल्याचा संशय व्यक्त केला.
प्रशासकीय बाबी लक्षात घेता गेली तीन चार वर्षे झाले की सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या कमिटी कार्यान्वित नाहीत,धर्मादाय प्रशासकाच्या अधिपत्याखाली सर्व कारभार चालतो.मग वर्तमान काळात जर कोणत्याही कमिटीचा सहभाग कायद्याने बंधनकारक आहे.तर मग लातुकरांबद्दल आत्मियता दाखवणे आणि आपल्या पदभाराच्या आधिन राहुन संविधानात्मक रीत्या पत्रव्यवहार करणे हा जर लातुरच्या केवळ समाज माध्यम असलेल्या ऑटो चालक ते पत्रकार..आज थार चारचाकी मध्ये स्वार..ज्याची कांहीं वर्षात इमारतही दिमाखदार..लिहितो ईतराचे विचार..आणि स्वतःला म्हणवीतो मीच खरा पत्रकार..वारे घेतो सुपारी..अन लिहितो दुपारी. पाकिटासाठी किती ही याची लाचारी.
कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसलेले व लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करणारे दीपक गंगणे,बाबासाहेब बनसोडे,यांना राजकीय खोडा,रिटर्न गिफ्ट,किंवा बोलवते धनी,टगे,पगारी लोक त्याच्या अशा भाष्यातून लिखाण करणाऱ्याला म्हणावे वाटते
वारे चोर तो चोर..वरून शिरजोर.हा स्थानिक पातळीवरील विचार करता अतिषय खेदा ची बाब आहे.
लातूर शहर पूर्व भागात गेली 20 वर्षापासूनचा सच्चा व निराधार लोकांच्या हाकेला धावून जाणारा.. समाजातील वास्तविकता मांडणारा..निर्भीडपणे स्वच्छ,स्पष्ट व खरी लेखनी करणारा पत्रकार अजूनही सायकलवरच फिरून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे पावित्र्य जपतो आहे.अशा पत्रकारांचा आदर्श घ्यावा असेच आहे..पण पत्रकारितेतील पवित्रे कशा सोबत खातात माहीत नसणार्यांना काय संबोधावे . लिफाफा पत्रकरिता करणाऱ्या लबाड लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलेलं.
समितीने कोणाच्याही विरोधात हा विषय घेतलाच नव्हता एक जन्मजात लातुरकर म्हणून.. आनुभवलेली यात्रा आणि आजची यात्रा हा विषय उचलला होता.दीपक गंगणे यांनी विक्रम तात्या गोजमगुंडे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव समितीत स्वयंसेवक म्हणून कार्य केलेलं आहे..व तात्यांच्या विविध अशा कल्पकतेतून निशुल्कातील यात्रा वाढीचा पांयडा समस्त लातुकाराणी जवळून अनुभवली आहे.
पण गेल्या काही वर्षापासूनच्या प्रशासकीय कार्यकाळातील यात्रेचे बाजारीकरण विरोधात आम्ही लातुरकर म्हणून केंद्रीय लोकप्रतिनिधी मा.खासदार साहेबांना विनंती केली होती.आणि त्यांनी एक लातुरकरांप्रती सेवाभाव जपत सर्वसामांन्य जनतेचा विचार करून ते पत्र दिले होते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषय कुठलाही असो पण एखाद्या खासदारांनी विनंती विशेष पत्र व्यवहार करत त्यांचा उच्च शिक्षित सुसंस्कृतपणा दाखवला होता त्याला जर जिल्हाधिकारी यांनी केराची टोपली दाखवली असा उल्लेख सोशलमीडिया माध्यम पत्रकाराने प्रसिद्धीस देणे योग्य आहे का.?
लातुरकरांनी आपली जत्रा जशी साजरी करायची ते करतील.पण सर्वसामान्य यात्रेकरूंचा विचार करून समितीच्या वतीने रोडवर आंदोलन केली,निवेदन दिले, त्याला खासदारांनी,तसेच विधितज्ञांनी व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे.यातूनच लक्षात येत आहे की आम्ही लातूरकरांची श्रद्धा असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळत आहेत.यात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रियात्मक भावना ही ठळकपणे दिसत आहेत.या विषयीतून जर कोणाला दिशाभूल करणारे लिखाण करून स्वतःची पोळी भाजानार्यांनाचा खोडा हेतू स्पष्ट दिसत आहे.
आंदोलन कर्त्याना प्रशासकांनी शब्द दिला आहे की यात्रेतील आनंद मेळा प्रवेश शुल्क २० रुपये केले आहे..शिवाय मागणी अनुसार यात्रेकरूंना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.हे पाठपुराव्याने यश च आहे समितीचे सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाचा ना कुठल्या ना कोणत्या भडवेगीरी करणाऱ्या जहागीरदारांचा १ पैसा घेऊन शर्मिंदे नसताना नाव ठेवणाऱ्याचा हेतूस किंमत न देता लातुरकर..म्हणून लातुरचा विचार करतात
लातूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान हे सर्वांचे आराध्य दैवत व अस्मिता आहे.
यात्रेच्या बाजारीकरण विघटीकरण खाजगीकरणाला कोणी विनाकारण मिरची मसाला घालून मोठया मोठया देवस्थानचे आर्थिक उत्पन्न समोर ठेवून उदाहरणे देत असतील तर त्या सोबतच तेथील देवस्थानांनी जनतेकरता दिलेल्या सुविधा,सेवा भावातून मोफत आरोग्य सेवेकरिता उभारण्यात आलेली इमारत,शैक्षणिक संस्था,निशुल्क धार्मिक मठ आदींचा स्वतःची अक्कल पाजळत उल्लेख करने गरजेचे होते.पण ते जाणून बुजून टाळल्याचे दिसून येते.त्यात लातूरांचे ग्रामदैवत देवस्थानाची बदनामी करत आहोत असे लिहणे अकलशून्य दिसून येते.लक्षात असू द्या लातुरकरांना विचलीत करण्याचा प्रयत्न करत आसाल तर ते योग्य नाही.जवळच्याच 700 वर्षाची जुनी परंपरा लाभलेल्या खडगाव रोडच्या यात्रेत प्रवेशा करिता शुल्क आकारले जात नाही.
काळाच्या ओघात झालेल्या विकासाची नांदी सर्व लातुरकर पाहत आहेत.मंदिराचा विकास म्हणत आसाल तर..त्यासाठी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी शासकीय निधी उपलब्ध करून दीला,ज्यांनी स्वताच्या कमाईचा पैसा लावला,त्यांनी स्वतःचा अमूल्य वेळ दिला, त्यांना लातूरकर कधीही विसरणार नाहीत.
यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मनोरंजनाचा आनंद घेणे न घेणे हा वयक्तीक प्रश्न आहे.पण यात्रेचे दोन तुकडे करून यात्रेचा गाभाच वेगळा करायचा आणि बाजुला ऊगाच जे लातुरात सहजपणे उपलब्ध आहे.
त्याची दुकान लावुन लातुरकरांना व सर्व यात्रेकरू लोकांना मुर्खात काढायचा यात्रेच्या निमित्ताने आनंद मेळा,जागतिक दर्जाच्या मनोरंजन सुविधा उपलब्ध करून दिलात मनःपूर्वक समाधान व्यक्त करण्यात आले पण ते जवळुन पाहण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ जाण्यासाठी पण यात्रा महोत्सव समिती प्रवेश शुल्क च्या नावाखाली यात्रे पासून अलिप्त ठेऊ नय ही विनंती.खासदार साहेबांनी अँड बळवंतराव भाऊ जाधव व इतर सामाजिक संघटनांनी केलेली प्रवेश शुल्क बंद करा हि मागणी काय चुकिचा कसी?
लातुर ग्राम दैवत श्री सिध्देश्वर मंदिर व यात्रा महोत्सव ही पुरातन पध्दतीने पूर्ववत चालू करावी, एवढीच अपेक्षा लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या पाठपुरावाने कुणाचेही अन कुठलेही नुकसान करण्याचा हेतू नव्हता नाही.
बाबासाहेब बाळू बनसोडे
संस्थापक सचिव
लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समिती , लातूर
मो.8483842335