जागतिक कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या देशाची, महाराष्ट्राची व पोलीस दलाची मान उंचावणारा पहिला अधिकारी- श्री वाहिद पठाण…

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :- श्री वाहिद पठाण हे सध्या डी.एन. नगर पोलीस ठाण्यात क्राइम पी . आय. म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी सन २०२० मध्ये पाहिलेले जगातील अतिशय खडतर कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत लागोपाठ मेडल मिळविण्याचे स्वप्नं दिनांक ९ जून २०२४ रोजी पूर्ण केले आहे.

हीच स्पर्धा सन २०२३ मध्ये त्यांनी डाऊन रन ( ८७.७ की. मी. ) नी आपल्या हितचिंतक आणि बॅचमेट यांनी सतत केलेल्या कौतुकामुळे आणि दिलेल्या साथीमुळे पार करू शकलो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रेरणादायी कौतुकामुळे यावर्षीही त्यांनी पुन्हा कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा- २०२४ अप रन ( ८५.९१ की. मी .) ११.४० मिनिटात म्हणजे दिलेल्या वेळेपेक्षा २० मिनिटे लवकर पूर्ण केली.
कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा सतत २ वेळा पूर्ण करणारे ते मुंबई पोलीस दलातील एकमेव व संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलातील ते क्रमांक ३ चे अधिकारी ठरले आहेत.
अशा ह्या जागतिक स्तरावरील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेत सतत २ वेळा आपल्या देशाची, महाराष्ट्राची तसेच मुंबई पोलीस दलाची मान उंचावणाऱ्या आर्यनमॅन पोलीस अधिकारी सन्मानीय श्री. वाहिद पठाण ( पोलीस निरीक्षक डी .एन. नगर पोलीस ठाणे) यांना सुरक्षा पोलीस टाइम्स मनाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
यावेळी त्यांच्या सोबत या स्पर्धेत. आपल्या देशाचे नावलौकिक करण्यासाठी श्री. साईनाथ ठोंबरे (ACP) , श्री संदीप पांडुळे (PSI) , श्री सतीश उमरे ( PI), श्री राजेश कोचे ( HC) , श्री अमोल अटोले (PC) श्री विठ्ठल कारंडे ( PC ), श्रीमती. अश्विनी देवरे ( HC) , श्री राहुल शितोळे ( HC ) आणि श्री रामनाथ मेंगाळ यांनी देखील आपले नशीब आजमावले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com