श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज कार्तिकीवारी पालखी (रथ) सोहळा श्री गणेशनाथ संस्थान पायी दिंडी यात्रा 2021

पोलादपूर प्रतिनिधि -श्री.सखाराम साने.
पोलादपूर(रायगड)सन 1948 च्या संस्थान स्थापना झाल्यापासून दरवर्षी प्रमाणे पोलादपूर ते गुरुकुल सेंदुर मलई ते पंढरपूर पाई तिर्थ यात्रा दिनांक 03 ते 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत गेली २० वर्षं पोलादपूर ते पंढरपूर पाई दिंडी सोहळा तन मन धनाने व भावनेने विठ्ठल नामाच्या गजरात १०दिवसाचा प्रवास करत आनंदाने पंढरपूर ठिकाणी पोहचतात .यामध्ये मोरसडे ते पोलादपूर .कुडपण ते पोलादपूर .व खेड ते पोलादपूर असे भाविक एकत्रीत होऊन मग दिंडीने पाईवारीला सुरुवात करतात .

पहिला मुक्काम माझेरी गाव. दुसरा मुक्काम हिर्डोशी. तिसरा मुक्काम भोर. चौथा मुक्काम तोंडल .पाचवा मुक्काम तरडगाव. सहावा मुक्काम वडजळ.सातवा मुक्काम कारुंडे लोंढे वस्ती आठवा मुक्काम माळशिरस. नववा मुक्काम तोंडलं बोंडलं करत पंढरपूर विठ्ठूराया चरणी समर्पित करतात .
या दिंडी सोहळ्यामध्ये मोठमोठे अन्नदाते सकाळचा अल्पोपहार दुपारची पंगत रात्रीची पंगत दान करतात. तसेच या संस्थानचे अधिपती मालक तपोनिधी अरविंदनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने काहीच कधीच कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. तीन राज्यात महाराष्ट्र कर्नाटक व गुजरात राज्य अशा तीन राज्यांतुन अनुयायी जवळजवळ पाच ते सहा लाख भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सामिल होतात.

सद्यस्थितीत ह भ प श्री ज्ञानोबा विठोबा मालुसरे हे प्रमुख संघटक म्हणून काम पाहतात .व ह भ प श्री बाळकृष्ण महाराज पवार. ह भ प श्री पांडुरंग महाराज उतेकर . इत्यादी दिंडी प्रमुख काम पाहतात .व ह भ प श्री नामदेव महाराज मोरे. सावळाराम महाराज चिकणे वसंत महाराज साने .संजय शेठ मोदी हे सर्व संस्थेच्या कारभारात मदत करुन संस्थेच्या भरभराटीकडे लक्ष देत आहेत. तसेच या संस्थानचे राजदंड प्रमुख ह भ प श्री तानाजी महाराज उतेकर हे आहेत . तसेच चोपदार पदी ह भ प श्री गणपत महाराज पांचाळ व ह भ प श्री कृष्णा विठोबा जामदार हे आहेत. या सर्व संस्थानला तपोनीधी अरविंदनाथ बाबा यांचा आशिर्वाद हा सतत आहे .
राम कृष्ण हरी .
ह भ प श्री सखाराम साने .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com
राम कृष्ण हरी .
ह भ प श्री सखाराम साने .