श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती रायगड जिल्हाअध्यक्ष तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती निमित्त माणगांव येथे शेकोडो भाविकांनी दर्शन घेतला सेवालाल महाराजाचे जीवनावर रायगड जिल्हा अध्यक्ष तुकाराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले त्याच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाने पुढे वाटचाल करावी असे आवाहन धर्मनेता भगवतं सेवक किसन भाऊ राठोड यांनी समाजाला केले आहे.

रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद रायगड तुकाराम हिरु चव्हाण,लहू हरिश्चंद्र राठोड
माणगाव तालुका अध्यक्ष,राष्ट्रीय बंजारा परिषद,अजय लहू चव्हाण संत सेवालाल महाराज जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष
देविदास चंदू राठोड जिल्हा खजिनदार राष्ट्रीय बंजारा परिषद श्रीकांत अन्नू राठोड खजिनदार माणगाव तालुका राष्ट्रीय बंजारा परिषद महेश रमेश राठोड उपाध्यक्ष मानगाव तालुका राष्ट्रीय बंजारा परिषद राहुल राठोड उपाध्यक्ष मानगाव तालुका किरण राठोड खजिनदार संत सेवालाल जयंती उत्सव कमिटी माणगाव विकास तारासिंग कार्याध्यक्ष माणगाव तालुका दिलीप चव्हाण लहू चव्हाण विकास राठोड,श्रीकांत राठोड,विलास राठोड काशिनाथ राठोड मोहन राठोड शिवा राठोड,अरुण राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत हर्षउल्हासात, जल्लोसात साजरा करण्यात आला यामध्ये समाज बांधवाने प्रचंड उत्सहात व जल्लोषात येऊन एक आगळी वेगळी उंची गाठली होती या कार्यक्रमाला अनेक ठिकाणावरून बंजारा समाज बांधव बॅनर व झेंडे लावून येत होते तसेच श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्री रोजगार हमी फलोत्पोदण खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य शिवसेना उपनेते नामदार श्री भरतशेठ गोगावले यांनी हजेरी लावली व समस्त माणगांवकर व रायगड जिल्ह्यातील गोर बंजारा समाजाला संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट