श्री राम लल्ला प्रतिष्ठान दिनी बोईसर पोलीस ठाणे हद्दीत लावलेले झेंडे, बॅनर्स, पताका, प्रतिमा हे वाऱ्यामुळे इतरत्र पडुन त्याची विटंबना थांबविण्यात प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान…

प्रतिनिधी- मंगेश उईके
बोईसर:– बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना विनंती करण्यात येते की, श्री राम लल्ला प्रतिष्ठापना दिनी शहरातील विविध सामाजिक संघटना ,सन्माननीय पदाधिकारी, नागरिक ,श्रीरामभक्त यांचे कडून शहरात / गावात विविध सोसायटीमध्ये , सार्वजनिक ठिकाणी, खाजगी दुकाने, आस्थापना, घरावर, वाहनावर भगवान श्रीराम यांची प्रतिमा असणारे झेंडे, बॅनर्स,पोस्टर्स, पताका लावून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
श्रीराम भक्तांकडून वरील नमूद विविध ठिकाणी लावलेले प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे झेंडे ,बॅनर , पताका हे वाऱ्यामुळे किंवा वेगवान जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावर किंवा इतरत्र पडून त्याची विटंबना किंवा अवहेलना होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून सर्व राम भक्तांना विनंती करण्यात येते की, त्यानी सदरचे झेंडे, बॅनर्स, पताका काढून घेण्यात यावेत व प्रभु श्री राम यांच्या प्रतिमा असलेले बॅनर व झेंडे यांचे पावित्र्य राखले जाईल याबाबत दक्षता घेवून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती शिरीष पवार
पोलीस निरीक्षक
बोईसर पोलीस ठाणे यांनी नागरिकांना केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com