श्री कृष्णा निवास एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित चेंबूर येथील संस्थेवर. अरेरावी…!

चेंबूर:-
प्रतिनिधी -सुशिल तांबे
श्री कृष्णा निवास एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित 36 श्रीकृष्ण निवास चाळ, व्ही एन पुरव मार्ग, कॉर्पोरेट पार्क समोर, चेंबूर मुंबई 400071 येथील रहिवासी आणि सभासद यांनी होवू घातलेल्या पुनर्वसन योजेनेअंतर्गत समितीला गेल्या पाच वर्षांतील माहितीची सदर रहिवाशी,सभासद,पदाधिकारी,यांनी मागणी केली असता सदर नियोजित संस्थेचे सचिव श्री महेंद्र कृष्णा गोरे यांनी सर्व लोकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत सभासदांनी विचारणा केल्या प्रकरणाबाबत दुर्लक्ष करून उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळं सदरच्या घटनेचा पदाधिकारी,सभासद व रहिवाशी यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
सर्व रहिवासी सभासद यांनी मागणीनुसार सर्व प्रकारचे कागदपत्र सदर संस्थेच्या दप्तरी पोच केलेले आहेत. योग्य प्रकारचे सहकार्य सदर रहिवासी सभासद यांच्यामार्फत होत आहे. सदर संस्थेच्या स्थापनेपासून वर्ष 2018 मागील 6 वर्षामध्ये फक्त 4-5 सभा झालेल्या आहेत.
दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी संस्थेच्या झालेल्या सभेमध्ये सचिव श्री महेंद्र कृष्णा गोरे यांनी सदर घटनेबाबत सभासदांनी विचारणा केली असता त्यांनीं असे सांगितले की जे काही रहिवाशांनी ऐकले आहे त्याबद्दल मला काही आठवत नाही. काही गोष्टी मी स्वतःशीच पुटपुटत असतो, त्यामुळे गैरसमज नसावा. श्री महेंद्र कृष्णा गोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सदर घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून कोणी दुखावले गेले असल्यास, त्यांची माफी मागितली.