दुकानातून कपड्याची चोरी करणारा आरोपी येरवडा तपास पथक कडून जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दि.१९/०४/२०२५ रोजी तपास पथकाचे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की कल्याणीनगर येथील एस एल एन्टरप्रायजेस नावाचे जॉकी कंपनीचे कपडयाचे शॉपमध्ये चोरी करणारा इसम नामे गणपत डांगी हा कल्याणीनगर येथे थांबलेला आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसले ने तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, व स्टाफ यांनी त्यास पळून जात असताना पकडून त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने गणपत मांगीलाल डांगी वय ४४ वर्षे रा विठ्ठल नगर सिंहगड रोड पुणे असे सांगितले.
सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन गु र नं २८०/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) मध्ये कपडयाचे शॉपमधून ०८,००,०००/-रु. किं. वे लेडीज व जेन्टस अंडरगार्मेंट चोरी केलेबाबत गुन्हा दाखल आहे. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने जून २०२४ पासून वेळोवेळी शॉपमधून लेडीज जेन्टस अंडरगारमेंट चोरी केल्याचे कबूली दिल्याने त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्या गुन्हयाचे कामी दि.१९/०४/२०२५ रोजी अटक गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीकडे अधिक तपास करता आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी ०७,३०,०००/-रु किं. चे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, श्री हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, पो.स्टे श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांनी केलेली आहे.