“शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली” यांचे प्रजासत्ताक दिनी गोपाळगड किल्ल्यावर ध्वजारोहण उपक्रम…

0
Spread the love

पत्रकार- सचिन घाणेकर

रायगड:- अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघवतीने ३५० वा “शिवराज्याभिषेक वर्ष” २६ जानेवारी २०२४ रोजी सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी एकाच दिवशी, एकसंघपणे ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वज फडकविण्याची जबाबदारी शिवप्रेमींनी घेतली होती.

रत्नागिरी जिल्हात एकूण २६ किल्ल्यांवर उपक्रम पार पाडला गेला. यामध्ये चिपळूण- गुहागर विभागात शिवराय मावळे प्रतिष्ठान, आबलोली यांनी अंजनवेल मधील गोपाळगड किल्यावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगवा, तिरंगा ध्वजारोहन यशस्वी पार पाडले.

अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच मान. सौ. सोनल मोरे मॅडम यांच्या शुभहस्ते राष्ट्रीयध्वज फडकविण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायले गेले. प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नितेश सुरेश पांचाळ यांच्या शुभहस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवर, प्रतिष्ठान सदस्य यांच्या उपस्थितीत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून सर्व नतमस्तक झाले.

उपस्थितांच्यासमोर गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवेन, स्वराज्याचा सोनेरी इतिहास समजून घेईन, किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही अशी शिवपप्रतिज्ञा घेतली गेली.

या उपक्रमासाठी अंजनवेल ग्रामपंचायत सरपंच मान. सौ. सोनल मोरे, सदस्य नंदकुमार खेतले, योगेश धामणस्कर, वहिदा खतीफ, सानिका नरवणकर, सैतावडेकर मॅडम, किल्ला जागा मालक ताबिश मणियार, प्रतिष्ठान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री. नितेश सुरेश पांचाळ, सदस्य शुभम मनोहर पांचाळ, प्रथमेश रमेश पांचाळ, सचिन घाणेकर, ऋषिकेश रवींद्र पांचाळ, विनीत सुभाष पांचाळ, प्रणव प्रकाश झगडे, सुबोध विलास जाधव, विक्रम विठ्ठल घाणेकर, शुभम साळवी, पंकज कदम उपस्थित होते.

उपक्रमासाठी अंजनवेल ग्रामपंचायत यांची उपस्थिती व सहकार्यासाठी सरपंच सौ. सोनल मोरे मॅडम यांचे प्रतिष्ठान वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्ण्यात आले. सरपंच सोनाल मोरे यांनी मनोगतामधून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष नितेश पांचाळ यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला, आधुनिक जगात जीवन जगत असताना आपले विचार कसे असावे व कर्तव्य काय आहे हे समजावून सांगितले व प्रतिष्ठानचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रकट केले. आणि शेवटी सर्वांचे आभार मानून उपक्रमाची सांगता केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट