*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेची अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे विशेष भेट…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बेलापूर: शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार दि.१३/०३/२०२३ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी संघटनेच्या नवी मुंबई पदाधिकार्यांसह अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे भेट दिली.

शिव आरोग्य सेनेकडे सौ.हर्षुला देशमुख राहणार तळोजा खारघर यांची लेखी तक्रार आली त्यांचा मुलगा कुमार साईश देशमुख वय ११ वर्षे हा अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे ऍडमिट होता, तपासणी केले असता तो एडिनो व्हायरस पॉझिटिव्ह ( adino virual flu) आढळून आला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर रुग्णांना बाधा होऊ नये म्हणून त्याला विलगीकरण करणे गरजेचे होते.अपोलो हॉस्पिटल यांनी मात्र खाजगी रूम दिला, विलीगीकरण वार्ड नसल्याचे सांगून सर्व रुग्णांना खाजगी रूम दिली जाते व खाजगी रूम चे भाडे दररोज रू.८१०० न परवडणारे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचे होत आहे बेलापूर विभागात पसरत असलेल्या या साथीची दखल घेऊन शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज दिनांक १३ मार्च २०२३ रोजी अपोलो हॉस्पिटल बेलापूर नवी मुंबई येथे जाऊन प्रशासनाची भेट घेतली व हॉस्पिटलचे डॉ.सुजित जाधव,डॉ.नरेंद्र पाटील यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी श्री.जॉन बॉस्को यांना अपोलो रुग्णालयात विलीगीकरण वार्ड सुरू करावा आणि रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे १५ वर्षाखालील रुग्णांना इतर रुग्णांप्रमाणे आयपीडी नंतर ८ दिवसांच्या आत येणा-या रुग्णांना ओपीडी शुल्क माफ करावे असे निवेदन देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर “आम्ही नक्कीच तुमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच विलीनीकरण वॉर्ड सुरू करू व बाकी मागण्यांचा विचार करू व आपणास लेखी माहिती देऊ असे प्रशासना कडून सांगण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख नवीमुंबई श्री.मनोज इसवे,शिव आरोग्य सेनेचे नवी मुंबई विभागीय समन्वयक (बेलापूर/ऐरोली विधानसभा), श्री प्रवीण वाघराळकर, पनवेल महानगर समन्वयक डॉ.परेश देशमुख,बेलापूर आरोग्य संघटक श्री.राकेश यादव,श्री.रोहित शिरसाट, श्री.साक्षत म्हात्रे, श्री.अनिरुद्ध नरूटे, श्री.दीपक जाधव, श्री.हितेश गायकवाड, श्री.लितेश केरकर व इतर शिवसैनिक उपस्थिती होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट