शिवसेना शिव आरोग्य सेना,वर्ल्ड वाइड ह्युमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीतर्फे डाॅ.मिनू बोधनवाला यांचा सत्कार…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: शिवसेना शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक २०/१०/२०२२ रोजी वाडिया हॉस्पिटल ला एएसीआय अर्थात अमेरिकन अॅक्रिडेशन कमिशन इंटरनॅशनल कडून बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनला मान्यता मिळून ते देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे.

त्याबद्दल हॉस्पिटलच्या सी.ई.ओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) डॉ.मिनू बोधनवाला यांचा सत्कार करून शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव साहेब ठाकरे यांची एरियल फोटोग्राफी द्वारा काढलेले महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची छायाचित्र पुस्तिका भेट देण्यात आली त्याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे कार्यकर्ते व AIACPC च्या महा.महिला सचिव सौ.ज्योतीताई भोसले,आरोग्य सेनेच्या डॉ.गौरी कोठारी, युवासेनेचे विद्या सरमळकर, अंगणवाडी सेनेच्या सौ.सुप्रिया ठोंबरे, विधा.संपर्कप्रमुख श्री.शिवाजी झोरे,WHRAF च्या मुंबई सरचिटणीस सौ.प्रमिला अडसूळ,मुंबई सचिव सौ.ऋतिका पंदूगडे AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड, श्री.लीतेश केरकर, घाट.सचिव श्री.प्रकाश आंब्रे, श्री.सुहास परब, श्री.अक्षय शिंगरे,अंजली भोसले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट