शिरवळ पोलीस ठाणे जि. सातारा यांनी एका युवकाकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ७ जिवंत काडतुस असा ९२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदेशीर शस्त्र (गावठी पिस्टल कट्ठा) चाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करुन त्यांना अवैद्य शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १९/११/२०२३ रोजी मॉर्निंग स्कॉड पेट्रोलींग दरम्यान इसमास त्यांच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निग स्कॉड करीता शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा, अंकुश गाडी यांना नेमणेत आलेले होते. मॉर्निंग स्कॉड दरम्यान त्यांना पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडलगत असले महापारेषण कंपनी समोर सहीस रोडलगत एक इसम त्याचे कडील मोटार सायकलसह मिळून आला होता, त्याचेकडे प्रथमदर्शनी विचारपूस केली असता त्याच्या हालचाली व हावभाव संशयीत जाणवल्याने पोहवा गाडी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक श्री नवनाथ मदने यांना कल्पना दिली. शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री. सतीश आंदेलवार व पोलीस पथकाने सदर इसमाची अधिक विचारपुस करुन अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर इसमाने सदरचे पिस्टल व जीवंत काडतुसे हि बेकायदा आपले कब्न्यात बाळगल्याचे निष्पन्न झालेने त्याचे विरुध्द शिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२३भारतीय हत्यार अधिनियम ३ (१),७,२५ अन्वये गुन्हा
दाखल करणेत आलेला आहे. माहे नोव्हेबर २०२२ पासून सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५ देशी बनावटीचे पिस्टल/कट्टे
त्याचप्रमाणे १७५ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पंगळ्या असा मद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वा पुढे हि अश्या कारवाया अधिक तीव्रतेने केल्या जाणार आहेत अशी माहिती श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांनी दिली आहे.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन सुचना प्रमाणे सदर कारवाई शिरवळ पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री नवनाथ मदने, सहा. पोलीस निरीक्षक श्री.सी. व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सतीश अदिलवार, पोलीस अंमलदार अंकुश गाडी, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, प्रशांत धुमाळ, अरविंद बा-हाळे, भाऊसाहेब दिघे यांनी सहभाग घेऊन केली आहे. कारवाईमधील सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक यांनी अभिनंदन केलेले आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com