शिरवळ पोलीस ठाणे जि. सातारा यांची अवैध गुटखा साठ्यावर कारवाई

सह संपादक- रणजित मस्के
सातारा
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवेद्य गुटखा साठा व गुटखा बनविण्याचे साहित्य पकडून एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला
( शिरवळ पोलीस ठाणेची जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर अवेद्य गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत महिलांना अनोखी भेट)


मा. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत नलवडे पोलीस निरीक्षक व शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मदतीने दिनांक ०६/०३/२०२५ रोजी मौजे शिरवळ ता खंडाळा जि. सातारा गावचे हद्दीतील स्टार सिटी अपार्टमेंटमधील गाळ्यांमध्ये छापा टाकला. सदर छाप्या दरम्यान पोलीसांनी एकूण १,०६,१९,३७०/-रु. कि.चा मुद्देमाल यामध्ये गुटखा पान मसाला ८३,१९,२७०/- रु., गुटखा बनविण्याचे मशीन व लागणारे सुपारी, पावडर, पॅकींग साहित्य आवश्यक मशीन्स १८,५०,०००/- रु. व एक चारचाकी वाहन ४,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस साो, यांनी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शिरवळ पोलीस ठाणेकडून पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे खास पथक तयार करुन मागील काही दिवसांपासून अवैद्य धंद्यांवर कारवाया चालू केलेल्या आहेत. दरम्यान दिनांक ०६/०३/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना मौजे शिरवळ ता खंडाळा जि. सातारा गावचे हद्दीत स्टार सिटी येथील बिल्डींगमधील एका गाळयामध्ये बेकायदेशीररित्या बाळगलेला प्रतिबंधीत पदार्थ/गुटखा घेवून जाणेकरिता काही व्यक्ती वाहन घेवून आले असल्याची अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची प्राप्त बातमी मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा यांना दिलेवर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यास सांगून संयुक्तीकपणे छापा टाकण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार, प्रियंका वाईकर यांच्या मदतीने मिळाले बातमीच्या ठिकाणी छापा टाकत पंचनामा कारवाई करुन एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यापैकी गुटखा पान मसाला ८३,१९,२७०/- रु., गुटखा बनविण्याचे मशीन व लागणारे सुपारी, पावडर, पॅकींग साहित्य आवश्यक मशीन्स १८,५०,०००/- रु. व एक चारचाकी वाहन ४,५०,०००/- रु. असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच याकामी वापरण्यात आलेले दोन गाळे सिल करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ८ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी ४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस निरीक्षक यांनी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे व व्यावसायिकांच्या त्रुटी शोधून त्यांच्याकडे खंडणी मागणे यासारखे प्रकार होत असल्यास त्याची माहिती पोलीसांना कळवावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येवून संबंधीतांवर उचीत कारवाई करण्यात येईल असे जनतेला आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत नलवडे पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलीस अंमलदार शशिकांत भगत, धरमसिंग पावरा, सुधाकर सुर्यवंशी, तुषार कुंभार, सचिन वीर, सुरज चव्हाण, अरविंद बाहाळे, भाऊसाहेब दिघे, दिपक पालेपवाड, तुषार अभंग, अजित बोराटे, सुधाकर सपकाळ, होमगार्ड संत्रीष इंगवले यांनी पार पाडलेली आहे.