शिर्डी येथे 32 जिल्याच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची अस्तित्व राज्यस्तरीय बैठक संपन्न…

प्रतिनिधी-रणजित मस्के
शिर्डी: ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी


काल शिर्डी येथे माझ्या आई च्या प्रमुख उपस्तीथीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची अस्तित्व राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली बैठकीला 32 जिल्ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आज पर्यंत संघटने केलेल्या कामाचा आढावा पहिल्या सत्रात झाला जेवणानंतर पुढील येणाऱ्या वर्षात काय काम संघटनेने करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या मार्गदशक श्री.मिलिंद जोशी काका यांनी संघटनेचे ध्येय समजून सांगितले अस्तित्व राज्य स्तरीय बैठकीत खालील मुद्दे काम करण्या साठी ठराव मंजूर केला बैठकी साठी अहमदनगर पदाधिकारी शिर्डी पदाधिकारी यांनी मेहनत घेतली महाराष्ट्रातील अनेक महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी यांच्या मदतीने बैठकीचे आयोजन साठी मदत झाली राजकीय पक्ष्यांच्या सोबत जाण्या पेक्षा आम्ही खाकी साठी लढू आणि युवकांना दिशा देऊ असे उच्चार सर्वांच्या तोंडी होते सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत सर्वजण तटस्थ होते अपंग असणारा पदादाधिकारी 400 किलोमीटर प्रवास करून संघटनेच्या बैठकीला उपस्तीत राहिला ही संघटनेच्या पदाधिकारी यांना प्रेरणा होती ज्या पण व्यक्ती ज्या समोरून किंवा पडद्या मागून बैठकीला मदत केली सहकार्य केले त्याचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून मना पासून आभार तुमच्या प्रत्येक हाकेला संघटना हजर राहील हा शब्द देतो दर वर्षी प्रमाणे 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम राज्य भर राबवणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन सूचना दिल्या


बैठकीत सर्वानुमते पुढील येणाऱ्या काळात मुद्यांवर काम करायचे हे मुद्दे मंजूर करून घेतले
1)पोलीस परिवार महामंडळ
2)महाराष्ट्र पोलिसांना सेवेत असतांना मोफत आरोग्य सुविधा
3)सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मोफत आरोग्य सुविधा
4)महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना हक्काची घरे
5)पोलीस पाल्यांना पोलीस भरती मध्ये वडील सेवेत असतांना आरक्षण
6) सेवेत असतांना पदोन्नतीने अधिकारी झालेल्या मुलांना पोलीस पाल्य आरक्षण लागू करणे
7) पोलीस पाल्यांची स्वतंत्र पोलीस भरती घेणे
8)vrs(मेडिकली अनफिट असणारे)स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांना सेवेत रुजू करून घेणे शासन निर्णय परत चालू करणे
9) पोलीस पाल्यांना उच्चशिक्षणासाठी स्कॉलरशिफ चालू करणे अश्या अनेक मुद्यांवर सर्वानुमते ठराव घेतले
संघटना महाराष्ट्रातील पोलिसांच्या प्रत्येक अडचणी सोडवेल ही शपथ घेतली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com