शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी करणारे अटकेत

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई- जुहू :- अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात चोरी करणाऱ्या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली. अर्जुन देवेंद्र आणि अजेय ऊर्फ रमेश देवेंद्र अशी त्या दोघांची नावे आहेत. सुरू केला. त्या दोघांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

जुहू परिसरात शिल्पा शेट्टीचा बंगला आहे. सध्या त्या बंगल्यात सजावटीचे काम सुरू आहे. गेल्या आठवडयात एक जण चेहऱ्याला रुमाल बांधून शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या बेडरूमच्या खिडकीतून तो आत शिरला. दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार शेट्टीच्या मॅनेजरच्या लक्षात आला. त्याने याची माहिती जुहू पोलिसांना दिली. मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ

निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विजय धोत्रे, अमित महांगडे, खांडेकर, भोसले, तासगावकर, तडवी, बनकर आदींच्या पथकाने तपास

पोलिसांनी ७० सीम्रीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना अर्जुन दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी अर्जुनला विलेपार्लेच्या नेहरूनगर येथून अटक केली. त्याच्या चौकशीत अजयचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. अर्जुन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात ११ आणि अजयविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. ते दोघे अमली पदार्थाचे व्यसन करतात. चोरी करण्यापूर्वी अर्जुनने बंगल्याची रेकी केली. त्या रात्री त्याने नशा केली. नशा केल्यावर ते रिक्षाने जुहू चौपाटी परिसरात आले. तेथून ते बंगल्याच्या मागील बाजूस आले. तेथील दोन भिंतीवरून चढून ते आत शिरले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट