शेतीचे मोटर केबल चोरी करणाराआरोपी शकील शहा दर्यापुर पोलीसांकडून जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती

अमरावती जिल्हयातील ग्रामीण भागामध्ये शेतीला पाणी देणारे मोटर व केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसविण्याकरीता मा.श्री. पंकज कुमावत, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता आदेशित केले आहे.

त्या अनुषंगाने श्री. सुनिल वानखडे, पो.नि.पो.स्टे.दर्यापूर यांचे मार्गदर्शनात स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असता, सदर पथकास दि. २३/०५/२०२५ चे रात्री ०७/३० वा. दरम्यान माहीती मिळाली की, लाखपुरी गावाजवळ एक संशयीत इसम आपले ताब्यातील मो.सा.ने शेतीचे विद्युत मोटर केबल घेवून जात आहे अशा माहीतीवरुन पोलीस स्टाफ घटनास्थळी रवाना होवुन मिळालेल्या माहीती प्रमाणे गेलो असता एक इसम रेल्वे पुलाजवळ आपले मो.सा. ने येतांना दिसला त्याला पोलीसांची चाहुल लागताच त्याने त्याचे ताब्यातील मो.सा. व केबल वायर तेथेच टाकुन शेतात पळु लागला त्याला पोलीस स्टाफ चे मदतीने पाठलाग करुन पकडुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने प्रवम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केलो असता त्याने त्याचे नाव शकील शहा जलील शहा, वय २७ वर्ष, रा. बाभळी, दर्यापुर असे सांगीतले. त्यास केबल वायर बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदर मोटर केबल वायर पूर्णा नदीपात्रावर लावण्यात आलेल्या शेतीच्या मोटर पंप वरील विद्युत वायर कापुन चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपीचे ताब्यातुन विद्युत केबलचे ०६ बंडल किंमत २७,६००/-रु चा माल जप्त करण्यात आला आहे. सदरचे चोरी बाबत पो.स्टे. अभिलेखावरील अप.क्र.२४९/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे. नमुद आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.स्टे. दर्यापुर पोलीस करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा.श्री. पंकज कुमावत, पोलीस अधिक्षक, अम.ग्रा., श्री. राहुल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापुर यांचे मार्गदर्शनात श्री. सुनिल वानखडे, ठाणेदार, पो.स्टे. दर्यापूर यांचे नेतृत्यात पो.उप.नि. हरीहर गोरे अंमलदार उमेश वाकपांजर, दिलीप चव्हाण, निवृत्ती बरगट यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट