शेतमजूर सालगडी असणाऱ्या कष्टकऱ्याने ३० लाख रुपये किंमतीची दोन एकर जमीन जिल्हा परिषदेच्या शाळेला दान..
प्रतिनिधी-महेश वैद्य
यवतमाळ: पत्नीच्या अंगावर दागिने नाहीत, भरजरी शालू नाही तर साथी साडी आहे. परशराम यांच्या अंगावर अगदी सामान्य कपडे तरीही “दानत मात्र राजाची, अंबानी व अदानी यांच्या पलिकडची आहे”

कष्टकरी बळीराजा दानत मात्र अंबानी, अदानी यांच्या पलीकडची
चार मुलीनंतर शाळा हेच पाचवे अपत्य समजून दोन एकर जमीन शाळेला दान करणारा महावेडा शेतमजूर परशराम वढाई
परशराम यांनी दोन एकर जमीन विकून ३० लाख रुपये म्हातारपणाची सोय म्हणून बँकेत ठेवले असते तर मिळालेल्या व्याजावर उर्वरित जीवन बसून खाल्ले असते, पण वेडेपणा केला व शाळेसाठी जमीन दान केली
*सालगडी, कष्टकरी, शेतमजूर व शेतकरी असणारे परशराम वढाई “जाणता राजाच”
स्वतः अडाणी, चारही मुली फक्त सातवी पास. मात्र शिक्षणाबद्दल प्रेम, जिव्हाळा व सहानुभूती असल्याने शाळेला काहीतरी द्यावे हे स्वप्न होते ते चारही मुलींच्या लग्नानंतर पूर्ण केले.
स्वतः शाळेतील मुख्याध्यापक यांचे बरोबर CEO, BDO, BEO यांना भेटून नोंदणी कार्यालयात जाऊन शेत सर्व्हे गट नंबर १३३ मधील दोन एकर जमीनीचे दानपत्र मुकाअ यांचे नावे तयार केले. नोंदणीचे पैसे प्राथमिक शिक्षकांनी वर्गणी काढून भरले.
यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील वाढोणा खुर्द गावात राहणारे परशराम वढाई यांनी आयुष्यभर शेतमजुरी केली, मोलमजुरी केली, सालगडी म्हणून रात्रंदिवस मेहनत केली. पत्नी सावित्रीबाई यांनीही पतीसमवेत काबाडकष्ट केले. काटकसर व कष्टाच्या जोरावर परशराम यांनी चार मुलींचा सांभाळ करत सात एकर जमीन टप्याटप्याने घेतली होती.
शोभा, जेबी, दुर्गा व माला या चार मुलींची लग्ने झाल्यानंतर पत्नी व मुलींची सहमती घेऊन अपुऱ्या जागेवर भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दोन एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आणि ३०ऑक्टोबर, २०२२ मध्ये दानपत्र करुन दिले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत १ली ते ८वी पर्यंत वर्ग आहेत. गरीबांची मुले या शाळेत शिकतात. या मुलांना चांगले वर्ग व खेळाण्यासाठी मोठे मैदान मिळाले तर गरिबांच्या मुलांचे कल्याण होईल असे परशराम यांना वाटते.
जोपर्यंत परशराम यांच्यासारखी वेडी माणसे गावोगावी आहेत तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेला मरण नाही. गोरगरिबांच्या शाळा नक्कीच अटकेपार जातील.
परशराम व सौ. सावित्रीबाई आपणास व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना अशी प्रार्थना संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com