शेतामध्ये अफुची लागवड करणाऱ्यास अंमलीपदार्थ विरोधी पथकाने २१८ झाडे केली जप्त

सह संपादक – रणजित मस्के
पिंपरी-चिंचवड:
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा
घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, बाळासाहेब कोपनर यांचे
मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ
विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व पोलीस
अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे
अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले.
दि २६/०२/२०२५ रोजी वरिष्ठ
पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पथक हे देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत देहु चिंचोली रोडवरील झेंडेमळा येथे
आलो असता पोलीस अंमलदार किशोर परदेशी व जावेद बागसिराज यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “देहुरोड
पोलीस स्टेशन हद्दीत काळोखे मळा व हागवने मळा सी.ओ.डी. भिंतीचे मागे असलेल्या कांद्याचे शेतामध्ये अफुची झाडे लावलेली
आहेत.” ती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना सांगितली. त्यांनी लागलीच ते स्वतः सपोनि सचिन कदम,
पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे व राजेंद्र बांबळे असे पथक तयार करुन
बातमीचे ठिकाणी छापा टाकुन इसम नामे दिलीप चंद्रकांत काळोखे, वय ५७ वर्षे, रा मु. काळोखे वस्ती, पो. देहुगाव ता हवेली
जि पुणे यास ताब्यात घेतले. तो कसत असलेल्या त्याचे मालकीचे कांद्याचे शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये अफुची
लागवड केली असल्याचे समोर आले. इसम नामे दिलीप चंद्रकांत काळोखे याचे मालकीचे शेतातून एकुण ३,२७,०००/- रुपये
किंमतीची अफु या अंमली पदार्थाची फुले, बोंडे आलेली हिरवीगार २१८ झाडे जप्त करण्यात आली आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह
पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे,
सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी
पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, किशोर परदेशी, जावेद बागसिराज, मयुर
वाडकर, शिल्पा कांबळे, राजेंद्र बांबळे यांचे पथकाने केली आहे.