शताब्दी महिला डाॅ. चा विनयभंग करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या आरोपी जयेश सोलंकी हॉस्पिटल निलंबनाची कारवाई करेल का ?

प्रतिनिधी- किशोर लाड
कांदिवली :-विकृत मनोवृत्तीचा सफाई कामगार जयेश सोलंकी हा कांदिवली पश्चिम येथील शताब्दी हॉस्पिटल / भारतरत्न डॉ.बाबासाहेब महा नगर पालीका सर्व साधारण रुग्णालयात कायम स्वरूपी सफाई कामगार आहे.
शताब्दी हॉस्पिटल मधील असेच काही कायम स्वरूपी कामगार हे कंत्राटी कामगार हॉस्पिटल मधील रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी असभ्य वर्तन व दादागिरी करीत असल्याचे यापुर्वी देखील निदर्शनास आले आहेत.
असाच प्रकार ७ ऑगस्ट २०२४ रोजी शताब्दी हॉस्पिटल मधील निवासी महिला डाॅ. या आपल्या बाथरूम मध्ये स्नान करीत असताना त्यांचा मोबाईल द्वारे आरोपी जयेश सोलंकी हा चित्रिकरण करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यानी तात्काळ आपल्या सहकारी डाॅकटरांच्या सहाय्याने रुग्णालयातील प्रशासनाकडे तक्रार केली व त्यानंतर जवळील कांदिवली पोलीस ठाण्यात देखील तक्रार केली आणि त्याच्यावर कारवाई देखील झाली. परंतू अशा विकृत मनोवृत्तीच्या इसमांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी चर्चा जोर धरू लागली आहे. तरच त्या महिला डाॅकटरला खरा न्याय मिळेल..!
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com