शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमीर खानजादा यांचा मृतदेह सापडला..!

0
Spread the love

उपसंपादक : राकेश देशमुख

पनवेल :- नवी मुंबईतील २ रिअल इस्टेट एजंट सुमित जैन आणि शरदचंद्र पवार गटाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमीर खानजादा हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.

मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिसिंग कम्प्लेंट मिळाल्यानंतर त्यांची बलोनो कार GPS च्या साहाय्याने ट्रॅक केली होती. त्यानंतर सुमित जैन यांचा मृत्यू देह पेण येथील गोगोदे गावच्या जंगल भागात सापडला. तर त्याचा जोडीदार अमीर खानजादा हे अद्यापही बेपत्ता होते.

आज सकाळच्या सुमारास पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कर्नाळा जंगलामध्ये अमीर खानजादा यांचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्याने दोघांचेही खून झाले असावेत असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. दोघांचे खून कोणी व कोणत्या कारणामुळे झाले असावेत याचा तपास पोलीस घेत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट