भोर विधानसभेसाठी शंकर मांडेकर मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार..!

0
Spread the love

प्रतिनिधी-मारुती गोरे

पुणे ग्रामीण :- भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला बसणार फटका

मुळशी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी भोर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भोर विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा फटका पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. चला लढूया परिवर्तनासाठी म्हणत निवडणुकीत ताकतीने उतरण्याचा निर्धार मांडेकर यांनी केला आहे.

२०३ – भोर विधानसभेची जागा ही शिवसेनेला (उबाठा) द्यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांनाच देण्यात आली. संग्राम थोपटे सलग तीन वेळा काँग्रेसकडून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. सलग ३ वेळा शिवसेना त्यांना प्रबळ प्रतिस्पर्धी राहिली आहे. त्यामुळे थोपटेंच्या उमेदवाराने शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीतून काँग्रेसला ही जागा देण्यात आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत मांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी भोर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत मांडेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुळशी तालुक्यात असणारा मांडेकर यांचा प्रभाव आणि भोर-राजगड या दोन्ही तालुक्यात संग्राम थोपटे यांच्याबद्दल असणारी नाराजी याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसणार आहे. त्यामुळे मांडेकर यांच्या अपक्ष उमेदवारीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.

तर महायुतीकडून उमेदवार जाहीर होत नसल्याने भोर विधानसभेत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीने पुरंदर मधून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार काल संध्याकाळी जाहीर केल्याने भोर विधानसभेचा उमेदवार जाहीर करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. उमेदवारी अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना या गुप्ततेबद्दल मोठी चर्चा रंगली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट