शाहुपूरी पोलीस ठाणेकडून सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे यांस२ वर्षाकरिता केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– सातारा जिल्ह्यामध्ये शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुद्धचे व तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे वय 20 वर्ष रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा ता. जि. सातारा याचेवर सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी व मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने शाहूपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय फडतरे साो, यांनी सदर सराईत गुन्हेगारा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक साले, सातारा यांचे मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती.
यातील सराईत गुन्हेगाराकडुन सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे शरिराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करीत होता. त्याचेवर दाखल असले गुन्ह्यामध्ये त्यास अटक व कायदेशीर कारवाई करुन ही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्याचेवर झाला नाही अगर त्याचे गुन्हेगारी कृत्यामध्ये सुधारणा झाली नाही. तसेच त्याचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारावर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील गुन्हेगारास श्री सुधाकर भोसले उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये सातारा जिल्हातून 2 वर्षा करिता हद्दपारिचा आदेश पारित केला आहे.

नोव्हेंबर 2022 पासुन उपद्रव्यी टोळयांना टोळयांमधील 58 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हददपारी, मोका, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने मा. अपर पोलीस अधिक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे शाहुपूरी पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.हवा. सचिन माने, पो.हवा. अब्दुल खलिफा व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार पो.हवा. अमित सपकाळ यांनी योग्य तो पुराव सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट