महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई 92.130/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थांची विक्री व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी सहा पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

दि. 20/07/2023 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री धनंजय फडतरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करंजे नाका ते मोळाचा ओढा जाणारे रोडवरुन एक इसम मोटारसायकल एम. एच. 11 सी.एन.7584 वरुन बेकायदा बिगर परवाना विमल गुटख्याची चोरटी वाहतुक करणार आहे. अशी मिळालेल्या माहीतीप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनी श्री प्रशांत बधे व पोलोस अंमलदार यांनी करंजे नाका ते मोळाचा ओढा जाणारे रोडवर सतर्क पेट्रोलिंग करून सापळा रचला. त्यानंतर दुपारचे सुमारास मिळाले बातमीप्रमाणे एक मोटारसायकल क्रमांक एम.एच. सी. एन. 7584 ही करंजे नाका झेंडा चौक येथे आलेवर पोलीसांनी सदर गाडीचा पाठलाग करुन गाडी थांबवली. तेव्हा पोलीसांनी सदर मोटारसायकलची तपासणी केली असता त्यावर दोन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु असल्याने पोलीसांनी मोटारसायकलवरील इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता वाहनचालक केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु बिगरपरवाना वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडुन केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 92.130/- रु. कि.चा माल जप्त करणेत आला असुन नमुद इसमावर शाहूपुरी पोलीसांनी गुटखाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचेविरुद्ध कारवाई केली आहे.

अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सतर्क पेट्रोलिंग करून अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई करत एका इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडून 92.130/-रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा. बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सो सातारा, श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. श्री. प्रशांत बधे, पो. हेड कॉ. सुरेश घोडके, .पो.ना. मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.

आरोपीचे नांव 1) अन्दर नजीर सय्यद वय 45 वर्षे रा. 2003 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट