शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची कडुन तडीपार गुंडासह त्याचे साथिदाराकडून घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघड

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : तडीपार इसमांना चेक करून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किद्रे यांनी पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे यांना सुचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी सहा पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला हद्दपार इसमांना चेक करून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या.

दि. 09/04/2023 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पाना गोपनिय माहिती मिळाली की. शाहुपूरी पोलीस ठाणे अभिलेखावरील चोरी व घरफोडी चोरी करणारा तडीपार इसम विपुल तानाजी नलवडे रा. करंज. सातारा हा करंजे परिसरातील कॅनॉलजवळ फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ करने परिसरात नमुद इसमाचा शोध घेत असतना तो करने कॅनॉलजवळ बसलेला दिसत त्याचेकडे पोलीस आलेचे दिसतात तो पळून जावू लागला म्हणून गुन्हे शाखेच्या स्टाफने सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याचेवर तडीपार कारवाईचा भंग केले दाबतचा गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची असमाधानकारक उत्तरे देवू लागला. म्हणून गुन्हे प्रकटकीरण शाखेचे अधिकारी / अंमलदार यांनी त्याचेकडे कौशल्यापुर्वक विचारपुस केली असता त्याने प्रथम सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याचा करंजे, ता. जि. सातारा येथील त्याचा दुसरा साथीदार याचेसह राजवाड परिसरातून अॅक्सेस मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून सदरची मोटार सायकल हि करजे भैरवनाथ पटांगणाजवळ सोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर करजे परिसरातून त्याचा दुसरा साथिदार वास करने येथुन ताब्यात घेवून त्या दोघांकडे चोरों व घरफोडी चोरीचे अनुशंगाचे विचारपुस केली असता त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेकडील चारचाकी वाहनाची चोरी करून सदरचे वाहन बोगदा परिसरात बेवारस स्थितीत सोडल्याची कबुली दिली. तसेच राधिका रोडवरील एक बंद घरफोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. सदर माहितीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी अभिलेखाची पडताळणी केली असता त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं 49/2023 मादविसंक 379 व गुरनं. 68/2023 भादिवसक 457,511 तसेच सातारा शहर पोलीस गुरनं. 297/20023 भादविसंक, 379 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली असून, त्यांचेकडुन घरफोडी व चोरीचे एकूण 03 गुन्हे उपडकीस आले आहेत.

अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनिय माहितीचे आधारे तडीपार गुंडास पळून जात असताना पाठलाग करून जेरबंद केले व त्याचे साथिदारास ताब्यात घेवुन त्यांचेकडून मोटार सायकल चोरी, चारचाकी वाहन चोरीसह घरफोडी चोरीचे एकुण 03 गुन्हे उघकीस आणून त्यांना नमुद गुन्हयाचे तपासकामी अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लेलेश फडतरे, सचिन माने, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल पवार, पो. हवा संतोष इष्टे, तुषार इमकले, प्रविण वायदंडे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट