शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- शाहूपुरी पोलीस ठाणे मध्ये दि.21/12/2023 रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार प्राप्त झालेलो होती. त्याप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 564/2023 भा.द.वि.सं.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समोर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेचावत सुचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मोटारसायकल चोर इसमांवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करत सूचना दिलेल्या होत्या.

दि. 28/12/2023 रोजी राहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे मोटारसायकल चारोच्या गृह्यातील संशयीत इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर संशयीत इसम हा सातारा एस. टी. स्टैंड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमाचा शोध घेतला असता तो मोटारसायकलसह मिळून आला. सदर इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केलेची कबुली दिली. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहूपुरी पोलीस ठाणे गु.र.नं.564/2023 भा.द.वि.सं.क.379 हा गुन्हा उघडोस आणला आहे. सदर गुन्हाचा तपास दादा राजगे पो.हवा.ब.नं.907 हे करित आहेत.

अशाप्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरीतील आरोपीस गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे ताब्यात घेवुन त्याचेकडुन 55,000/- रुपये किंमतीचा मोटारसायकल हस्तगत करुन मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधोक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सुमित मोरे, सचिन पवार, स्वप्निल पवार, स्वप्नील सावंत, सुनिल भोसले यांनी केली आहे.

आरोपीचे नांव :-

1) सुरज हणमंत सांळुखे वय 22 वर्ष रा. सावली ता.जि. सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट