शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडुन २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- शाहुपूरी पोलीस ठाणे मध्ये दि.01/02/2024 रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे शाहूपुरी पोलोस ठाणे गु.र.नं. 62/2024 भार्यावसं कलम. 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशो यांनी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघकीस आणणेवावत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकरून कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
दि.01/02/2024 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांने केला असुन तो राजवाडा सातारा येथील नगरवाचनालय परिसरात फिरत असल्यावावत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमांचा शोध घेतला असता तो मोटारसायकल सह मिळून आला. सदर इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्याने नमुद गुन्ह्यातील मोटारसायकल व त्यासोबत शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एक मोटारसायकल चोरी ले चुली दिलो आहे. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं. 62/202 2/2 379 व शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं. 47/2024 भादविसं कलम-379 असे दोन गुन्हे उघडकी सदर गुन्ह्याचे तपास पो.ना. 1881 साबळे व म.पो.ना. 2340 करपे हे करीत आहेत.
अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरीतील रेकॉर्डवरील सराईत आरोपीस गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे ताब्यात घेवुन त्याचेकडुन 80,000/- रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकल हस्तगत करुन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे
आरोपीचे नांव :-
अभिजीत ऊर्फ राहुल राजाराम लोहार वय.41 वर्ष रा. 195 सोमबार पेठ सातारा ता.जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com