शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे. मोबाईल व मोटारसायकल असा 29000/- रू. चा मुद्देमाल जप्त.

उसपादक – रणजित मस्के
सातारा :-
सातारा शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री बाळगणे व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीचा बागर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यानी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सुचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धारदार शस्त्रे विक्री, वाळगणे व वाहतुक करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या..
दि. 04/08/2023 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना त्यांच्या गोपनीय बातमी दारामार्फत माहीती मळाली की एक लाल रंगाचा टि शर्ट घातलेला इसम काळे रंगाये हिरो पेंशन मोटरसायन वरून पांढरे रंगाचे पोत्यामध्ये धारदार शस्त्र घेवून दत्तकृपा मोटर गॅरेजचे समोर मोळाचा ओढा येथून जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचला. मिळाले बातमी प्रमाणे 19.00 वा. सदर वर्णनाचा इसम मोटरसायकलवरून येत असताना दिसला त्यास आम्ही पोलीस स्टाफने थांबण्याचा इशारा करून त्यास थांबवले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्रम अशोक सांकुखे वय 24 वर्षे रा. नेले ता. जि. सातारा असे असलेचे सांगीतले यावेळी त्याचे जवळ असलेल्या पांढरे रंगाचे पोत्यात काय आहे असे विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्ली. म्हणून पांढरे रंगाचे पोते उघडून पाहीले असता त्यामध्ये वेगवेगळया आकाराचा एक कोयता व दोन सुरे अढळून आले त्यावेळी त्याचे जवळ मिळून आलेल्या धारदार शस्त्रा बाबत त्याचे जवळ विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर दिले नाही, त्याचेजवळ असलेल्या धारदार शस्त्राबाबत त्याचेकडे कोनता परवाना आहे अगर कसे असे विचाले असता त्याचे जवळ बाळगणे बाबत कोणताही परवाना नसले बाबत सांगीतले. म्हणून सदर इसमास तव्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे आणून त्याच्यावर आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.

अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हेप्रकटिकरण शाखेने बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटारसायकल असा 29000/- रू. चा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांचेमार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि श्री. कृष्णा गुरव, पोहा सुरेश घोडके, पोना-मनोज मदने निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, जोतिराम पवार, पोको- सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.
आरोपीचे नांव विक्रम अशोक सांळुखे वय 24 वर्षे रा. नेले ता. जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com