शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत आरोपीस केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-दिनांक 16/02/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना त्याचे खास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धीरज शेळके नावचा इसम समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणारे रोडवर हॉटेल अजिंक्यतारा जवळ निळे रंगाची जीन्स व ग्रे कलरचा हाफ बाह्याचा गोल गळ्याचा टीशर्ट घातलेला इसम फिरत असुन त्याचे जवळ अग्नीशस्व असुन त्यास ताब्यात घेवुन कारवाई करा असा तोंडी आदेश दिला, समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणारे रोडवर हॉटेल अजिंक्यतारा जवळ आम्ही गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार सापळा रचुन थांबलो असताना मिळाले बातमीच्या वर्णनातील निळे रंगाची जोन्स व ग्रे कलरचा हाफ बाह्याचा गोल गळ्याचा टीशर्ट परिधान केलेला एक संशयीत इसम येत असल्याचे पाहून आम्ही पोलीस स्टाफने त्यास थांबवीले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदारानी त्यास पकडून ताब्यात घेतले.
त्यावेळी गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव धिरज विजय शेळके वय-29 वर्षे, रा.मु.पो.जकातवाडी ता.जि. सातारा असे असल्याचे सांगितले.
त्यावेळी सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले, त्याचे जवळ मिळून आलेल्या पिस्टल बाबत त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगणेचा परवाना आहे काय याबाबत त्यास विचारले असता त्याने त्याचे जवळ कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. अश्याप्रकारे शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अंमलदारानी सदर इसमास अग्नीशस्त्र गुन्हयाचे कामी ताब्यात घेवुन त्याप्रमाणे शाहुपुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.न.94/2024 शस्व अधिनीयम कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. ए. बागवान हे करीत आहेत.
अशाप्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदार यांनी सराईत गुन्हेगारास अटक करून त्याचेकडून 75,000/- रु. किंमतीचे अग्नीशस्त्र हस्तगत केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.
आरोपी नांवे – 1) धीरज विजय शेळके वय-29 वर्षे, रा.मु. पो. जकातवाडी ता. जि. सातारा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com