शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तीन दिवसात रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरीचा गुन्हा उघड

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- शाहुपुरी पोलीस ठाणे मध्ये दि. १४/१०/२०२३ रोजी रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरीची तक्रार प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ४२६/२०२३ भा.द.वि.सं.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरी करणारे अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दि. १७/१०/२०२३ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे सदर गुन्हाच्या घटनास्थळावर जावुन रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरीबाबत माहिती घेवुन संशयित इसमाचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १४/१०/२०२३ रोजी चोरीस गेलेले रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर हे एका इसमाने चोरी केलेबाबत समजले. त्याप्रमाणे सदर संशयीत इसमास ताब्यात घेवुन सदरच्या रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने ते चोरी केले असल्याचे सांगितले. सदर आरोपीने चोरी केलेले ४०,०००/- रुपये किमतीचे कॉम्प्रेसर (मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ४२६/२०२३ भा.द.वि.सं.क. ३७९ हा आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक ब.नं. २३४० पुनम करपे या करीरी 2/2 आण

अशाप्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरीचा गुन्हा दाखल झालेनंतर नमुद गुन्ह्याच्या तपासाकामी एका संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन तीन दिवसाच्या आत ४०,०००/- रुपये किंमतीचे रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल

दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, पोलीस नाईक महेश बनकर, अमय साबळे, पोलीस अंमलदार सचिन पवार,

स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले, महिला पोलीस नाईक पुनम करपे यांनी केली आहे

आरोपीचे नांव :-

१) महादेव शंकर वायदंडे वय ३५ वर्षे रा. सम्राट हॉटेलच्या शेजारी कोडोली सातारा ता. जि. सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट