शहापुर पोलीसानी अनोळखी इसमाचा खुन करुन पुरावा नष्ठ केलेल्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यानी केली अटक..

शहापूर :
सह संपादक – रणजित मस्के

दिनांक 30/04/2025 रोजी 10.41 वा.चे पुर्वी उबरखांड गावचे हद्दीत मुंबई नाशिक महामार्गालगत मोकळया जागेत कोणीतरी अज्ञात आरोपीत यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन एका अनोळखी पुरुष वय 25 ते 30 वर्षे यास जिवे ठार मारुन पुरावा नष्ठ करण्याचे उद्देशाने प्रेत मुंबई नाशिक महामार्गालगत टाकुन दिले याबाबत पो.हवा/1310 गोपाळ दत्तु भवन नेमणुक शहापुर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शहापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 132/2025 बी.एन.एस. कलम 103 (1), 238 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहुन मा.श्री.डॉ.डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा.श्री. भारत तांगडे. अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, यांनी घटनास्थळी भेट देवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेश देवुन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे मा. उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री. मिलींद शिंदे, शहापुर विभाग यांनी श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण व श्री. जितेंद्र ठाकुर, पोलीस निरीक्षक, शहापुर पोलीस ठाणे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले.
सदर दोन्ही पथकांनी अहोरात्र अथक परीश्रम घेवुन घटनास्थळापासुन सी.सी.टीव्ही चे माध्यमातुन तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यांतील मिसींग बाबत माहीती प्राप्त करुन, तसेच अनोळखी मृतदेहाचे फोटोचे बॅनर (स्टिकर) बनवुन ते ठिक-ठिकाणी चिकटवुन त्याबाबत माहीती प्रसिध्द केली. तसेच राज्यातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुप व पोलीस पाटलांचे व्हॉटसअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहीती देवुन ती प्रसिध्द करण्यात आली अनोळखी मृतदेहाचा तपास करीत असताना सदर अनोळखी मृतदेह हा अशोक सुखदेव मधे रा. सावतामाळीनगर, पांडुर्ली, ता. सिन्नर जिल्हा नाशिक याबाबत माहीती मिळुन आली तसे दोन्ही पथक हे मयताचे मुळगावी जावुन तेथे मयताचे नातेवाईक यांचे कडे तपास केला असता मयत हा त्यांचेच गावातील वसीम पठाण याचे बरोबर गेला असल्याची माहीती मिळाली त्यास लागलीच ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्य पुर्ण विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार राहुल गुंजाळ याचेसह केलेला असल्याची कबुली दिल्याने वरील पथकांनी राहुल गुंजाळ यास देखील ताब्यात घेतले आहे त्याने देखील सदरचा गुन्हा केलेला असल्याची कबुली दिलेली आहे. यातील आरोपीत 1) वसीम बालम पठाण वय 32 रा. पांडुर्ली ता. सिन्नर जि. नाशिक 2) राहुल संजय गुंजाळ वय 24 रा. पांडुर्ली ता. सिन्नर जि. नाशिक यांनी शितल फोडसे हिच्या सांगण्यावरुन गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने महीला आरोपीत 3) शितल केशव फोडसे रा. भंडारदरा वाडी, भरवीर, ता. इगतपुरी जि. नाशिक हिस ताब्यात घेवुन सर्व आरोपीत यांना पुढील तपास कामी शहापुर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरचा गुन्हा मा. उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री. मिलींद शिंदे, शहापुर विभाग स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेश मनोरे, शहापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि श्री. महेश कदम, पोउनि श्री. अंकुश वारुंगसे, नेम. शहापुर पो.स्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणचे स.फौ. सुनिल कदम पो.हवा/प्रकाश साईल, संतोष सुर्वे, सतीष कोळी, हेमंत विभुते, गोविंद कोळी व पो.शि / स्वप्नील बोडके, व शहापुर पोलीस ठाण्याचे पो. हवा./ शशिकांत पाटील, विकास सानप, पो.ना मंजुर शेख, रमेश नलावडे, मोहन भोईर, पो.शि/दशरथ देसले, कमलाकर शिरोसे व वासिंद पोलीस ठाण्याचे पोशि सुरेश धिंदळे व पडवळ तसेच सायबर विभागाचे पो.हवा / दिपक गायकवाड यांचे पथकाने उघडकीस आणलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास शहापुर पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र ठाकुर हे करीत आहेत,