जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :- दि. 10 जुलै 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत
लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि. 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील. असे नागरिक पात्र समजण्यात येतील.) ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्विकारले जातील.
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य / केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतील .
उत्पन्न मर्यादा लाभार्थ्यांचे कांटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहिल.
सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहिल. मात्र दोषपूर्ण / अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात रु. 3000/- थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहिल. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

निवड / निश्चित केलेल्या जिल्ह्यात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र : आधारकार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
उपरोक्त योजनेचे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी लाभ घ्यावा असे अवाहान सहायक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांनी केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com