जेष्ठ नागरीकांना इन्शुरन्स पॉलीसी मॅच्युरीटीचे आमिष दाखवून करोडोची फसवणुक करणारे सायबर गुन्हयात अटक…
उपसंपादक -रणजित मस्के
मुंबई: घाटकोपर, मुंबई येथील ड्रायफ्रुटचे होलसेल व्यापारी यांना दिनांक ०८/११/२०२१ ते दिनांक ०४/०८/२०२२ या कालावधीत वेगवेगळया अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अनोळखी आरोपीतांनी फोनवर संपर्क साधून तसेच मेल आय. डी. वर मेल संपर्क करून आपसात संगणमत करून कट कारस्थान करुन ते इन्शुरन्स कंपनी मधुन बोलत असल्याचे सांगुन फिर्यादी यांची एक पॉलीसी असल्याचे सांगुन ती सरेंडर केल्यास सदर पॉलीसीची रक्कम ७,७०,९३,०२८/- रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवुन ती रक्कम फिर्यादी यांना मिळवून देतो असे सांगुन, तसेच ते भासवुन व विश्वास संपादन करून वेळोवेळी विविध कारणांसाठी अनेक बँकेत पैसे भरण्यास भाग पाडले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय रिझव्ह बँकेच्या रिसिप्ट, रिझर्व्ह बँकेचे पत्र, नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन ऑफ इंडीयाचे पत्र तसेच मिनीस्टर ऑफ फायनान्सचे सही शिक्क्यानिशीचे बनावट कागदपत्रे ईमेलव्दारे पाठवून त्यांची एकुण रुपये ४,३९,५७,५३२/- इतक्या रक्कमेची आर्थिक फसवणुक केली होती त्यावरून पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे गु. २.क्र. २०/२०२२, कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), ५०६, ३४ भादवि सह कलम ६६ (ड) भारतीय तंत्रज्ञान कायदा २०००-२००८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात एकुण २७ विविध राज्यातील विविध बँकखाते निष्पन्न झाले होते. त्यामध्ये हैद्राबाद येथील बँकेतील खात्यामध्ये नमुद गुन्हयातील एकुण ७१ लाख रूपये इंश्युरन्स पॉलिसीच्या मॅच्युरीटीच्या नावाखाली घेण्यात आले होते. त्यामध्ये अटक आरोपी अनुजकुमार बालेश्वर सहा वय २१ वर्ष, राहणार नोएडा, गौतमबुद्ध नगर, उत्तरप्रदेश हा लाभधारक बँकखातेधारक असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यास दि. ०७/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपीच्या तपासात अनुजकुमार बालेश्वर सहा याचे नोएडा, उत्तर प्रदेश येथे मोबाईल शॉपीचे नाम मात्र दुकान असुन त्यातून इंन्श्युरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणुक करणाऱ्या टोळीशी संगनमत करून फसवणुक केलेली रक्कम स्वत:च्या खात्यामध्ये घेवून तो नोएडा परिसरातील विविध बँकांचे एटीएमद्वारे विथड्रॉव्हल करून तसेच विविध बँकांमध्ये मनी ट्रान्सफरद्वारे वळती करून सदरच्या रक्कमांची संगनमताने विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अटक आरोपीत संदिप कुमार लालताप्रसाद, वय २८ वर्ष राहणार गाझियाबाद, उत्तरप्रदेश यास दि. १४/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीताने सदर गुन्हयातील बँकखाते आरोपीतांना देवून प्रत्येक बँक खात्यामागे १५ हजार रुपये मिळवित असे. अशा प्रकारे त्याने मागील १ वर्षाच्या कालावधीत २५ बनावट बँकखाते उघडून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे बँकखाती ही उघडतेवेळी गुन्हयातील निष्पन्न बँकखातेधारक यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांचे बनावट घरभाडे करारपत्र तयार करून त्याआधारे आधारकार्ड वर पत्ता बदलून मोबाईल कंपनीकडून मोबाईल सिमकार्ड घेवून ऑनलाईन पध्दतीने विविध बँकांमध्ये त्यांचे नावे बँकखाते उघडत असे. तसेच एटीएम डेबीट कार्ड हे कुरीअर कंपनीमार्फत स्वतःकडे घेवून सदरचे एटीएम डेबीट कार्ड व बँक धारकांचे मोबाईल सिमकार्ड हे आरोपीत रवि सिंह सरोज सिंह व सुमीत चौधरी यास देवून ते फसवणूक केलेल्या अनेक रक्कमांची विल्हेवाट लावत असे. तसेच सदर आरोपीत हा रविकुमार सरोजसिंह याचेकडून लोकांचा डेटा घेवून त्यांना इन्श्युरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवून व नोकरी देण्याचे अमिष दाखवून लोकांना फोन करून त्याने पाठविलेल्या रक्कमा वरील नमूद बनावट बँकखात्यामध्ये घेवून फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.अटक आरोपीत नामे रवि कुमार सरोज सिंह, राहणार ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश यास दि. १७/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीत हा सलारपुर, मंगेल, नोएडा, उत्तरप्रदेश येथे कॉल सेन्टर चालवित असून त्याचे कॉलसेन्टर मधून त्याचेसोबत काम करणारे इसमांकडून व स्वतः अनेक राज्यातील लोकांना कॉल करून त्यांना इन्श्युरन्स रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवून तसेच नोकरी देण्याचे अमिष दाखवून तसेच OLX वर जाहीरात देवून लोकांकडून लाखो रुपयांच्या रक्कमा घेवून फसवणूक करत असल्याचे निधन झालेले आहे.
सदर गुन्हयातील तपासादरम्यान आरोपीतांने वापरलेले मोबाईल क्रमांक व आय. एम. ई. आय क्रमांक हे मुंबई शहरातील ३ गुन्हयाशी तसेच विविध राज्यातील एकुण ११ गुन्हयात असे एकूण १४ गुन्हयांशी मिळतीजुळती आलेली आहे.
सदर गुन्हयात आरोपीतां कडुन विविध बँकाचे १८ एटीएम डेबीट कार्ड, बैंक पासबुक, विविध राज्यातील लोकांची फसवणुक करण्याकरीता तयार करण्यात आलेले नाव, फोन नंबर व ईमेल आय.डी., आधारकार्ड, आयकर विवरण व सॅमसंग कंपनीचे ०७, विवो कंपनीचा ०१, रिडम भी कंपनी ००१, ओपो कंपनीचा ०१ व रिअल मी कंपनीचा ०१ असे एकुण १२ मोबाईल व लिनोआ कंपनीचे ०३ शिंक पेंड, डेल कंपनीचा एक लॅपटॉप, एच पी कंपनीचा एक लॅपटॉप व रुपये ४४,४००/- रोख जप्त करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयात अदयाप पर्यंत आरोपीतांच्या बँक खात्यामधील फसवणुक केलेली रक्कम २० लाख ५० हजार रुपये फ्रीज करण्यात आली आहे. आरोपीत याने मागील एक वर्षाच्या कालावधीत अनेक लोकांची फसवणुक करून फसवणुक केलेल्या करोडो रूपयांच्या रक्कमा काटुन विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सदर अटक आरोपीताचा सहभाग अश्या प्रकारे जेष्ठ नागरीकांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून फसवणुकीच्या अनेक गुन्हयामध्ये निष्पन्न होत आहे. त्याबाबत तपास चालू आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. बाळसिंग राजपूत (सायबर गुन्हे), मा. सहायक पोलीस आयुक्त, राजेश नागवडे, प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस. सहस्त्रबुध्दे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ मोरे यांचे पर्यवेक्षणाखाली पो.नि. प्रकाश वारके, स.पो.नि. श्रीनिवास कामुणी, पोलीस हवालदार ३१४२७ / राजेश पाटील, पोलीस हवालदार ९८०४७६ / आकाश शिंदे, पोलीस शिपाई ०९३२९७ / किसन राठोड, पोलीस शिपाई ०९०४५७/ युवराज पाटील, पोलीस शिपाई ०९२५९२ / प्रताप जाधव यांनी पार पाडली.
याद्वारे मुंबई पोलीस सर्वसामान्य जनतेस आवाहन करीत आहेत की,
१. जेष्ठनागरीक, जनसामान्य लोकांना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या भामटयां पासुन सावध रहावे.
२. मोबाईल फोनवरील अनोळखी व्यक्तीला आपला बँक अकाउंट नंबर, पासवर्ड, ओ.टी.पी., केवायसी, डेबीट कार्ड क्रमांक, आधारक क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक अशी संवेदनशील माहिती मागत असतील तर फोन त्वरीत कट करून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
३. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्या वरून कोणतेही मोबाईल ॲपडाउन लोड करू नये तसेच लिंक क्लिक
करू नये.
४. कृपया बँक खाती उघडण्यासाठी तुमची कागदपत्रे इतर व्यक्तीस देवु नयेत, कोणासही तुमचे सिमकार्ड वापरण्याची परवानगी देवु नये. दुसरा वापरत असलेल्या आपल्या गोष्टी बेकायदेशीर कारणांसाठी वापरल्या जावु शकतात.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com