19 वर्षाखालील मुलींच्या रायगड जिल्हा क्रिकेट संघातुन एन.एस. क्रिकेट अकॅडमी माणगावच्या कु. वेदिका तेटगुरे व कु. कनक यादव यांची निवड…

✍️प्रतिनिधी सचिन पवार
माणगांव रायगड :- माणगांव :-रायगड जिल्ह्यातील 19 वर्षाखालील मुलींची नुकतीच निवड चाचणी झाली. या निवड चाचणीसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मुली उपस्थित होत्या. त्यामधून अंतिम संघात कुमारी . वेदिका तेटगुरे व कुमारी .कनक यादव यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांचे प्रशिक्षक श्री. नयन शिंदे यांनी दिली प्रशिक्षक नयन शिंदे यांनी मुलींसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांना यश आल्यामुळे शिंदे यांनी कु.वेदिका तेटगुरे व कु. कनक यादव यांच्या खेळातील प्रगती बाबत समाधान व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले.


माणगांव तालुक्यातून लवकरच रायगड जिल्ह्याचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रितांच्या स्पर्धेत खेळणार आहे,खेळाडूंनी मैदानाबाहेर काय करावे हा त्याचा व्ययक्तीक प्रश्न आहे. पण माणगांव तालुक्यातून महिला संघाच्या खेळातुन पाहायला गेलो तर वेदिका तेटगुरे व कनक यादव या दोन्ही मुली उत्कृष्ट खेळीतून मन जिंकतील योग्यरित्या समोरच्या टीमला पराभूत करून माणगांव चे नाही तर रायगडचे नाव रोशन करतील यासाठी या दोघींना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएअन निमंत्रीताच्या स्पर्धेत स्थान मिळाले आहे. यासाठी संपूर्ण माणगांव तालुक्यातून या दोघीच अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देखील व्यक्त केल्या जात आहेत .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com