कोलाड तिसे येथील फाटक वर असणारे सुरक्षा रक्षक चंद्रकांत कांबळे यांच्यावर एका अज्ञात इसमानी गोळीबार करून केला पोबारा….

0
Spread the love

प्रतिनिधी सचिन पवार

माणगांव रायगड

कोलाड :-रोहा तालुक्यातील कोलाड रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या तिसे फाटकवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे चंद्रकांत कांबळे यांची आज दुपारी 1.30 च्या दरम्यान एका अज्ञात इसमानी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. ही घटना इतकी भयानक होती की सदर रेल्वे कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात व रक्तबबांल झाल्याचे दिसून आले आहे. ही बातमी कोलाड पोलिसांना समाजात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. व तपास सुरु केले नेमक या हत्येमागचा कारण काय एवढ्या अमांनुषपने चंद्रकांत कांबळे यांना कां मारले यांचा पूर्णपणे तपास रायगड पोलीस करीत आहेत. तसेच पोलिसांनी तपासाची सूत्रे अतिवेगाने हाताळली असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असे सांगण्यात आले.

या दुर्दैवी घटनेची रायगड जिल्ह्यात सर्वत्र हलहल व्यक्त होत आहे. चंद्रकांत कांबळे हे कोलाड जवळील पाले बुद्रुक गावचे रहिवासी होते गेले अनेक वर्ष कोकण रेल्वेत नोकरी करीत होते नोकरी सांभाळून समाजकार्य करण्याची आवड असल्याचे ते आंबेडकर चळवलीचे सक्रिय कार्यकर्ते होते तालुक्यात बौध्द समाज संघटनेचे पदाधिकारी होते व तिसे रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक काम पाहत होते. चंद्रकांत कांबळे हे दि.२१ ऑगस्ट रोजी तिसे फाटक वर काम करीत असताना दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी एका अज्ञात इसमानी चंद्रकांत कांबळे यांच्या डोक्यात गोळी झाडली व कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. हा भयानक प्रकार घडला तेव्हा रहदारीच्या रस्त्यावर कोणीच कस नव्हतं हा रस्ता तिसे गावाकडे जाणारा असल्याने गावाकडे जाणारा कोणीच कस नव्हतं येणारी जाणारी गावची लोकसंख्या मोठी असून हा रस्ता गजबलेला असतो त्यामुळे कोणाला केलेल्या गोळीबार चा आवाज कसा आला नाही याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रेल्वे कर्मचारी यांची निर्घृन हत्या कां केली असावी यांच कारण अस्पष्ट दिसत आहे. कारण चंद्रकांत कांबळे हा सर्वसामान्य जिवन जगणारा माणूस होता त्याचे कुणाशी वाद असतील असे वाटत नाही मग नेमक त्याच्या बाबतीत नक्की झालं काय? त्याच्या जीवाशी नेमक बेतलं कोण हे कोड सर्वांना पडलेला आहे.चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी आठ टीम सज्ज झाले असून अज्ञात आरोपी च्या लवकरच मुसक्या आवलल्या जातील असं रायगड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट