जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांचेमार्फत शाळा सुरक्षा अभियान…!

0
WhatsApp Image 2024-12-28 at 10.32.09 PM
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर:-

दिनांक 19 ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. सदरचे कार्यक्रम जिल्ह्यातील 6 शासकीय आश्रमशाळा येथे संपन्न झाला.
सदर प्रशिक्षण NDRF चे प्रादेशिक प्रतिसाद केंद्र पालघर, टीम कमांडर ब्रिजेश कुमार, मुकेश कुमार त्यांची टीम यांचेमार्फत देण्यात आले. या दरम्यान प्रशिक्षण देण्यात आलेल्या विद्यार्थांची संख्या खालील प्रमाणे आहेत.

  1. शासकीय आश्रमशाळा वरवडा, ता. तलासरी एकुण विद्यार्थ्यी संख्या 1002.
  2. शासकीय आश्रमशाळा अस्वाली ता. डहाणू एकुण विद्यार्थ्यी संख्या 605.
  3. शासकीय आश्रमशाळा नंडोरे ता. पालघर एकुण विद्यार्थ्यी संख्या 600.
  4. शासकीय आश्रमशाळा कोरेगाव ता. मोखाडा एकुण विद्यार्थ्यी संख्या 596.
  5. शासकीय आश्रमशाळा पाली ता. वाडा एकुण विद्यार्थ्यी संख्या 659.
  6. शासकीय आश्रमशाळा झाप ता. जव्हार एकुण विद्यार्थ्यी संख्या 606.
    दिनांक 19 ते 26 या सहा दिवसात एकुण 3528 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणात
    आपत्ती दरम्यान काय करावे, काय करु नये, हर्ट अटॅक आल्यास सीपीआर देणे, पुर परिस्थितीत घराघरातील वस्तू वापरुन स्वत चा व इतरांचा जीव कसा वाचवायचा, आपघात झाल्यास काय करावे, भूकंप, आग, थंडीच्या लाटा, उष्णतेच्या लाटा यापासून बचाव कसा करावा. तसेच प्रथमोपचार पद्धती शिकवण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट