अनुसूचित जमातीच्या युवतींसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण…

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :
पालघर, दि. 17 : आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अनुसूचित जमातीच्या युवतींसाठी मोफत सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर यांच्या मार्फत राबविला जात आहे. प्रशिक्षण केंद्र पळसुंडे, ता. मोखाडा, जि. पालघर येथे सुरू होणार आहे.
पात्र युवतींसाठी निवड प्रक्रिया दि.६ मार्च २०२५ पासून सुरू होईल.निवड प्रक्रिया आणि वेळापत्रक: दि.६ मार्च २०२५: शारीरिक पात्रता चाचणी दि.७ मार्च २०२५: लेखी परीक्षा (फक्त पात्र ठरलेल्या (उमेदवारांसाठी) दि.८ मार्च २०२५ रोजी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.पात्रता निकष: उंची: किमान १५० सेमी वजन: किमान ५० कि.ग्रा. वय: १८ ते २६ वर्षे,शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण,प्रवर्ग: अनुसूचित जमाती (S.T) आवश्यक कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र,नांव नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रशिक्षणार्थींना भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. निवड प्रक्रियेसाठी येण्या-जाण्याचा व राहण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही. संपर्क:
९९२१३४८७१५ (संबंधित अधिकारी) ८८३०९९३६८८ (केंद्र प्रमुख) युवतींनी ६ मार्च रोजी उपस्थित राहावे!
या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक युवतींनी ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता पळसुंडे, ता. मोखाडा, जि. पालघर येथे हजर राहावे. असे आवाहन करिष्मा नायर, प्रकल्प अधिकारी, जव्हार यांनी केले आहे.