एल. सी. ची, सांगली व एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे यांची सुंगधी तंबाखु व गुटखा सुपारी पॅकेजींग कारखान्यावर छापा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :- मुद्देमाल हस्तगत .

फिर्यादी नाव

अनिल अरुणराव पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, सांगली.

एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे

माहिती कशी प्राप्त झाली

ता. १३.०४.२०२४ रोजी

पोहेकों / दिपक गायकवाड पोहेकों / कपिल सांळुखे

दि. १३.०४.२०२४ रोजी दुपारी वा चे दरम्यान

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली
निलेश मसारे, सह. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, सांगली. पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील एम. आय. डी. सी. पो. ठाणे. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शा,
पोलीस उप निरीक्षक विश्वजीत गाढवे, श्रेणी पोउपनि. राजेंद्र नलावडे, एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे. अनिल अरुणराव पवार, चन्नवीर स्वामी, अन्न व सुरक्षा अधिकारी, तानाजी कुंडलिक कवळे, नमुना सहाय्यक, अन्न व औषध प्रशासन विभाग, सांगली.

पोहेकों / दिपक गायकवाड, कपिल सांळुखे, नागेश कांबळे, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, अमर नरळे, दरिबा बंडगर, पोशि / सुनिल जाधव, विनायक सुतार, सुरज थोरात, अभिजीत ठाणेकर, चासपोफी / मुलाणी, चापोकों/ सुशांत चिले. स्था. गु. अ. शा सपोफी / जितेंद्र जाधव, अनिल भोसले, पोहेकों/ महादेव नागणे, संदीप पाटील, आण्णासो नरुटे, शंकर तराळ, चापोहेकॉ शरद कोळेकर, पोना / संजय पावरा, पोकों/ आसिफ सय्यद, मधुकर सरगर, अविनाश पाटील, एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे.

अटक वेळ दिनांक

दि. १३/०४/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

१. योगेदंर रामब्रिज सिंह, वय ३० वर्षे, मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश.

२. द्रुक गंगा सिंह, वय २४ वर्षे, मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश.

३. मोनु रामबहादुर सिंह, वय ३० वर्षे, मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश.

४. हरीओम पुन्ना सिंह, वय ४५ वर्षे, मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश.

५. देव बमर सिंह, वय २२ वर्षे, मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश.

६. २ बालअपचारी.

जप्त मुद्देमाल . १२,७६,८००/- रु. किंमतीची ३१.९२ किलो एम. सेंटेड टोबॅको. १

२. ३,००,०००/- रु. किंमतीच्या ३ मटेरियल पेंकिंग मशीन जु. वा. किं. अं.

  1. ३. १,८०,०००/- रु. किंमतीची ४५ किलो वजनाची सुट्टी गुटखा सुपारी.

४. २४,०००/- रु. किंमतीची २४ किलो सुट्टी सुंगधी तंबाखु.

५. ८३,०००/- रु. किंमतीची १६.६ किलो माणिकचंद गुटखा

६. ६०,०००/- रु. किंमतीचे ६० पॅकिंग पेपर बंडल जु. वा. किं. अं.

७. ५२,६००/- रु. किंमतीची पॅकिंगच्या बॉक्सची १६ पोती जु. वा. किं. अं.

१९,७६,४००/- (एकोणिस लाख शहात्तर हजार चारशे रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.

त्या अनुशंगाने दि. १३/०४/२०२४ रोजी पोहेकों / गायकवाड व कपिल सांळुखे यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, दत्तनगर, बामनोळी येथे पत्र्याचे शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी
सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, दत्तनगर बामनोळी परिसरात निगराणी करीत असताना, एक शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याचा बातमीप्रमाणे
संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पत्र्याचे शेडवर पंचासह जावून छापा टाकला असता, सदर ठिकाणी सुगंधी तंबाखु व गुटखा तयार करणासाठी लागणारा कच्चा माल व मशीनरी मिळून आल्या आणि तेथे काम करणारे एकूण ७ इसम मिळून आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नांवे १) योगेदंर रामब्रिज सिंह, वय ३० वर्षे, २) द्रुक गंगा सिंह, वय २४ वर्षे, ३) मोनु रामबहादुर सिंह, वय ३० वर्षे, ४) हरीओम पुन्ना सिंह, ५) देव चमर सिंह, वय २२ वर्षे, आणि २ बालअपचारी सर्व मुळ रा. सिकदंरा, आग्रा, राज्य उत्तर प्रदेश व सध्या रा. अहिल्यानगर, कुपवाड असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी योगेदंर रामब्रिज सिंह यांस विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, सदर कारखान्यात गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असून सदरचा कारखाना हा शहाणवाज पठाण रा. अहिल्यानगर, कुपवाड हा चालवित असल्याची कबूली दिली.

लागलीच सदर मुद्देमाल हा सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व अनिल अरुणराव पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, सांगली यांनी शासकीय पंचा समक्ष जप्त केला असून याबाबत एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अवैध गुटख्याबाबत काही माहिती मिळाल्यास जवळचे पोलीस ठाणे अगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली किंवा पोलीस अधीक्षक, सांगली यांचेशी संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट