सावंगा विठोबा यात्रेतङ भक्तांना मारहाण करुन जबरी चोरी करणारा आरोपी सोनल पवार स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती :

आरोपी नाव

१) सोनल सुरसिंग पवार वय ३३ वर्ष, रा. मोगरा ता.जि. अमरावती

दिनांक ३०/०३/२०२५ रोजी फि, व त्याचे मित्र सावंगा विठोबा येथे गुडीपाडवा सणानिमित्त दर्शनाकरीता यात्रेत आले असतांना रात्री १० वा. दरम्यान तलावाजवळ फि, व त्याचे मित्र संडासला गेले असता अज्ञात दोन तिन ईसमांनी त्यांना लाठ्या-काठयांनी मारहाण करुन फि, व त्यांचे मित्रांचे वेगवेगळया कंपनीचे तीन मोबाईल कि.अं. २६,०००/-रु व ६००/-रु नगदी असा एकुण २६,६००/-रु. चा मुद्देमाल जबरीने हिसकावुन चोरुन नेले. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. चांदुर रेल्वे येथे अप.क्र. १०९/२०२५ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सा., (भा.पो.से.), अमरावती ग्रामीण यांनी जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.

त्या अनुषंगाने जबरी चोरी गुन्हयाचा समांतर तपासात स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील मो. तस्लीम व त्यांचे पथक हे चांदुर रेल्वे उपविभागात रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदरचा गुन्हा हा सोनल पवार रा. मोगरा याने त्याचे साथीदारासह केला असुन तो अमरावती येथे कॅम्प परिसरात आलेला आहे. अशा माहितीवरुन त्यास चपराशी पुरा, अमरावती चौकातुन त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सोनल सुरसिंग पवार वय ३३ वर्ष, रा. मोगरा ता.जि. अमरावती असे सांगीतले. वरुन त्यास गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याने सांगीतले की, दिनांक ३०/०३/२०२५ रोजी सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याचे यात्रेमध्ये मी व माझे दोन मित्रांनी दारुच्या नशेत रात्री १० वा. दरम्यान तलावाचे काठाजवळ अंधारात सुनसान जागेत बसलेल्या तीन लोकांना काठ्यांनी मारहाण करुन त्यांचे कडील दोन विवो कंपनीचे व एक सैमसंग कंपनीचा एक असे तीन मोबाईल व त्यांचे पाकीटामधील ६००/-रु जबरीने हिसकावुन पळून गेलो असे सांगीतले. वरुन त्याचे ताब्यातुन चोरुन नेलेले विवो कंपनीचे दोन मोबाईल कि.अं. १८,०००/-रु जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणला असून गुन्हयातील ईतर फरार आरोपीतांचा शोध घेण्यात येत असून ताब्यात घेतलेला आरोपी व त्याचे कडून जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. चांदुर रेल्वे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा.. अमरावती ग्रामीण, श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, व चालक प्रशिक वानखडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट