साई प्रेरणा अपार्टमेंट मध्ये गुढीपाडवा उत्सव निमित्त सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी…

संपादिका -दिप्ती भोगल
विरार :– आपण लहान पासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्वच जण त्या आनंदी दिवसाची वाट पाहत तो दिवस काल शेवटी उजाडला आणि श्री सत्यनारायण आणि जिवदानी देवीच्या व शिवछत्रपती यांच्या कृपेने काल गुढीपाडवा नव हिंदू नववर्ष निमित्ताने आपल्या सर्वांचा आनंदाचं दिवस ते म्हणजे त्या दिवशी सोसायटीची श्री सत्यनारायण महापूजेची आमच्या सर्वांचीच स्वप्न पुर्तता..पुर्ण झाली आणि आम्ही सर्वच आनंदी धन्य आणि सुखी झालो..! असे मत यावेळी सोसायटीतील रहिवाशांकडून ऐकण्यात आले.



या शुभमुहूर्तावर प्रथमच १३ वर्षांनंतर साई प्रेरणा अपार्टमेंट आयोजित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोसायटी मध्ये पहिल्यांदाच … मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ या गुढीपाडवा उत्सव निमित्त व हिंदू नववर्ष च्या मुहूर्तावर सोसायटी मध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.




या कार्यक्रमाला सकाळी महिलांनी रंगरागोळी करुन गुढी उभारून गुढीपुजन करुन सत्यनारायण महापूजा व होमहवन करण्यात आले .या पुजेसाठी पाच जोडपे बसवण्यात आले होते .
सोसायटीचे सल्लागार श्री संदिप झिमण यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार व दिपज्योत करण्यात आले
व या शुभदिनी सोसायटीतील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला विभागातील अनेक महिला मंडळ यांनी हजेरी लावली होती व पुजेदरम्यान भाविकांना तिर्थ
व महाप्रसाद ची व्यवस्थाही करण्यात आली होती. आणि अनेक भाविकांनी तिर्थपसादाचा व महाप्रसाद याचं लाभ घेतले.
रात्री श्री साई श्रदधा भजन मंडळ विरार यांचे सुस्वर भजन करण्यात आले .
या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला व सर्व उपस्थित सर्व रहिवाशांनी हा कार्यक्रम व्यवस्थित रीतीने पार पडल्याबदल सोसायटी तर्फे त्याचं खुप खुप आभार मानण्यात आले.
या महापुजेसाठी यथाशक्ती प्रमाणे सेवा व पुजेसाठी देणगी देणारे याचे मनापासून सत्कार करण्यात आले.
व बाहेरून आलेल्या सर्व रुममालक महिला व स्थानिक रहिवासी व महिला मंडळ रुममालक यांनी आपल्या या कार्यक्रमाला चांगली साथ दिली बदल खुप खुप आभार मानण्यात आले.
कालचे कार्यक्रम व महापुजा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.
रहिवासी यांचे पुजेचे आनंदाचे वातावरण पाहून मन प्रसन्न आणि खुश झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेब व विभागातील सर्व मान्यवर समाजसुधारक व विभागातील सर्व सोसायटी रहिवाशी यांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्या सर्व उपस्थित सर्व रहिवासी याचे सोसायटी तर्फे मनापासून स्वागत करण्यात आले.
या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे सेक्रेटरी श्री कैलास काप यांनी केले .
या पुजेचे व कार्यक्रमाचे नियोजन साई प्रेरणा अपार्टमेंट अध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी मंडळ व सर्व रुममालक व रहिवासी यांच्या तर्फे करण्यात आले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com