साताऱ्यात पोलिसांसाठी मानसिक स्वास्थ्य कार्यशाळेचे आयोजन संपन्न..

सह संपादक – रणजित मस्के
सातारा


सातारा जिल्हा पोलीस दल व परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकरीता पोलीसांचे मानसिक स्वास्थ्य” कार्यशाळा आयोजित केलेबाबत
सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकरीता दिनांक 17/04/2025 रोजी सकाळी 10.00 ते 13.00 या कालावधीत पोलीसांचे मानसिक स्वास्थ्य या विषयावरील कार्यशाळा पोलीस करमणुक केंद्र सातारा येथे आयोजित करण्यात आली सदरचो कार्यशाळा मा.पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दल व डॉ. हमीद दाभोळकर, मनोविकास तज्ञ परिवर्तन संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेमध्ये सातारा-यातील सुप्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ व परिवर्तन संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी पोलीसांना नेहमी चोरी, मारामारी, खुन, दरोडा यासारख्या नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलीसांचे मानसिक स्वास्थ्य खराब होवुन मन निराश होते त्यामुळे पोलीसांना वेगवेगळे शारीरिक आजार होतात. शारीरीक आजार हे मनाशी सलग्न असतात. यातून बाहेर येण्यासाठी” पोलीसांचे मानसिक स्वास्थ्य” यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सहकारी श्रीमती रुपाली भोसले, मानसिक आरोग्य विभाग, प्रोग्राम कॉडीनेटर व श्रीमती योगिनी मगर, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट सातारा यांनी MYCA App द्वारे मानसिक स्वास्थ्याची माहिती देवून विविध खेळांद्वारे मानसिक स्वास्थ्य कसे राखावे हे शिकविले.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व डॉक्टर हमीद दाभोळकर मनोविकार तज्ञ व परिवर्तन संस्थेचे मार्गदर्शक यांनी वाढत्या उष्णतेवर उपाय वृक्षारोपणाद्वारे आगळ्या वेगळया पध्दतीने कार्यशाळेचे उद्घाटन केले. तद्नंतर डॉ हमीद दाभोळकरांचे व त्यांच्या सहका-यांचे स्वागत श्री समोर शेख पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यशाळेस 155 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थित राहुन आपले अभिप्राय पुढीलप्रमाणे दिले.” पोलीसांचे मानसिक स्वास्थ्य या प्रकारची कार्यशाळा म्हणजे पोलीस दलातील बदलाची नवी उभारणी आहे. MYCA App द्वारे मानसिक स्वास्थ्याची तपासणी करुन त्यातील विविध खेळांमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास उपयोग होणार आहे. या कार्यशाळेचा दैनंदिन जीवनात फार चांगला उपयोग होणार आहे. हि कार्यशाळा पोलीस दलासाठी गरजेची आहे.
सातारा पोलीस दल भविष्यात पोलीसांचे व त्यांचे कुटूंबीय यांच्याकरीता परिवर्तन संस्था यांच्या माध्यमातुन मानसिक स्वास्थ्य केंद्राची उभारणी पोलीस मुख्यालय येथे करणार असलेबाबत पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख यांनी सांगितले.