‘सातच्या आत घरात’ ही पुराणकथा आता कायमची थांबवायलाच हवी!-पोलीस उपायुक्त- स्मार्तना पाटील

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-महिलाना अंधाराची भीती नसतेय, अंधाराच्या आडून त्यांच्यातर अत्याचार करणान्या माणसांची भीती असते. उच्च शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करून कुटुंवाला हातभार लावणारी स्त्री किती सक्षम आणि सबला असू शकते, हे शब्दांत मांडता येणार नाही.

सावित्रीबाईनी संघर्ष केला म्हणून शिक्षण मिळाले. शिक्षण घेतले म्हणून नोकन्या मिळाल्या, नोकन्या करताना सुरक्षेचा प्रश्न आता सुटायलाच हवा. त्यासाठी पोलीस प्रशासन तर सोबत आहेच, समाजानेही एकसंघ होण्याची
गरज आहे.

दैनिक लोकमतच्या या ‘नाइट वॉक’च्या माध्यमातून समान हक्कांचा आवाज महिला बुलंद करतील, असा माझा विश्वास आहे. त्यांच्या आत्मसन्मानाला बळ देण्यासाठी हा उपक्रम खूप महत्वाचा आहे.

पुण्यामध्ये रात्रपाळीला काम करणाऱ्या अनेक महिला आहेत. शिफ्ट संपल्यावर रात्री बेरात्री त्या बाहेर पडतात. त्यांना जरी ते सेफ वाटत असले तरी त्या घरी पोहोचेपर्यंत घरच्यांना कुठेतरी धाकधूक असतेच.रात्री बाहेर जायला हरकत नाही है. घरच्यांना पटवून देण्यासाठीच हा एक उत्तम उपक्रम आहे. आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

मोबाइल आहे, अनेक सुविधा आहेत; मात्र, वर्षानुवर्षे महिलांनी रात्री बाहेर पढ़णे योग्य नाही, या पुराणकोला मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे.

महिला सुरक्षेचा जागर करण्याचा हा उपक्रम महिलांना नक्कीच ताकद देणारा ठरेल. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. आत्याचाराच्या घटनांना पायबंद बसेल, महिलांना निर्भय करण्यासाठी निर्भया पथक कार्यरत करण्यात आले आहे.

समाजातील प्रत्येक स्त्रीकडे वस्तु, उपभोगाचे साधन म्हणून बधायची दृष्टी आपला समाजच देत असतो. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थाही याला अपवाद नाही. निर्भया, रेडी प्रकरण किंवा हिंगणघाट सारख्या घटना थांबवायच्या असतील तर पुरुषांचा दृष्टिकोनच बदलायला हवा, तरच स्त्रिया समाजात सुरक्षित राहतील, पुरुषी मानसिकता महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरते आहे. जर आपल्याला समाजातील अंधार कमी करायचा असेल तर ‘रातरागिणी सारखे उपक्रम दिशादर्शक ठरतील.

पोलिसांच्या वतीने रात्री १२ पासूनकाही संस्थांना सोबत घेऊन सुरक्षित शहर ही पुण्याची ओळख आहेच. मात्र, ते पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. आता या उपक्रमामुळे वा प्रयत्नांना बळ मिळणार आहे. महिला स्वतःसाठी लढायला शिकल्या तरच त्यांच्या लेकींना या समाजात मध्यरात्री पुरुषांप्रमाणे फिरता येईल. दैनिक लोकमत कायमचं विधायक उपक्रमातून स्त्रियांसाठी झटत आले आहे. महिलांच्या न्यायहक्काचे रक्षण करण्याचीच भूमिका लोकमतची राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमात आम्ही त्यांध्या सोबत आहोत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट