साताऱ्यात एकीव धबधब्याजवळ दरीमध्ये २ इसमांना ढकलून केलेला दुहेरी खूनाचा गंभीर गुन्हा ७२ तासात उघड…

0
WhatsApp Image 2023-07-21 at 6.52.33 PM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक २६ / ७ / २०२३ रोजी दुपारी ४.४५ वा. सुमारास एकीव ता. जावली जि.सातारा येथील धबधब्याचे जवळ दोन अनोळखी इसमांनी दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन, त्यांना धबधब्याचे दरीत ढकलून देवून त्यांचा खून केला असल्याचे दिले तक्रारी वरुन मेढा पोलीस ठाणे गुरनं ११४ / २०२३ भादंवि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुहेरी खुनाच्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू
बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद गुन्हा उघड करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस
निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी
अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केले.

तपास पथकाने सर्वप्रथम गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळावरील आजूबाजूचे साक्षीदारांच्याकडे विचारपूस केली. तांत्रिक विश्लेषन तसेच एकीव ते सातारा मार्गावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. तपास पथक नमुद गुन्हयाचा तपास करीत असताना दि. २० / ७ / २०२३ रोजी श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा ४ इसमांनी मिळून केलेला आहे.

त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व तपास पथकास नमुद इसमांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांच्या पथकाने संशईत ३ इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी मयत दोन इसम व त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन दोन्ही इसमांना मारहाण करुन दरीमध्ये ढकलून दिले असल्याचे सांगितल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाचे आत उघडकीस आला असून नमुद तीनही इसमांना पुढील कार्यवाहीकामी मेढा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, संतोष तासगांवकर मेढा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, राजू कांबळे, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, अमृत करपे मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश घोरपडे, वाई पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

सदर गुन्हयातील आरोपी
१ ) साहिल मेहबूब शेख वय १८ वर्षे

२) निखिल राजेंद्र कोळेकर वय २३ वर्षे आणि

३) आसिफ माजिद शेख वय २२ वर्षे सर्व रहाणार भीमाबाई आंबेडकर नगर, सदरबजार, सातारा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट