साताऱ्यात सलग 6 दिवसात 6 गुन्हे उघडकीस आणुन डी. बी. पथकाने केली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी…!
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-
गुन्हे उघडकीस आणण्याचा मारला षटकार मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु वागेर सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करा विभाग कराड अमोल ठाकुर सी. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व डीबी पथकाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत सलग 06 दिवसात 06 गुन्हे उघडकीस आणून गुन्हे उघडकीस आणण्याचा मारला षटकार.
कराड शहरात दिनांक 01/09/2023 रोजी नवग्रह मंदीर परिसरातील विजय भांडी स्टोअर्सची पाठीमागील भिंत लोखंडो पारच्या सहयाने फोडुन दुकानातील देवाच्या पितळी धातुच्या मुर्ती व पितळी कळस असा एकुण 69,000/- मुद्देमाल चोरी करण्याची घटना घडली होती. सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल आहे सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पो. उप अधिक्षक अमोल ठाकुर सो यांनी मिंटीग घेत गुन्हा उघड आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर सुचने प्रमाणे पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांनी गुन्हयाचा तपास करीत असताना दोन संशईत इसम हे पितळी धातुच्या मुर्ती व पितळी कळस विक्रीसाठी कराड शहरात कृष्णा सर्कल येथे येणार आहे. अशी खबर पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे यांना मिळाली होती.
सदर खबरीच्या अनुषंगाने सापळा रचुन आरोपी नामे अशोक नंदाप्पा बिराजदार रा. मुजावर कॉलनी कराड ता. कराड जि. सातारा व निखिल सुरेश सोनवणे रा. मुजावर कॉलनी ता. कराड जि. सातारा यांना ताब्यात घेवून यांचे जवळ असले पिशवी तपासली असता अशोक बिराजदार याचे ताब्यात पितळी मूर्ती तसेच निखिल सोनवणे याचे ताब्यात पितळी कळस मिळुन आला सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन अधिक चौकशी केली असता त्याने वरिल गुन्हयाची कबुली दिली असून नमुद गुन्हयातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कराड गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग 06 दिवसात पुढील एकुण 06 गुन्हे उघड करत गुन्हे उघडकीस आणण्याचा षटकार मारला आहे. कराड शहर पोलीस ठाणे 01) गुरन 1036/ 2023 कलम भादवि 379 अन्वये नोंद असून एक आरोपी अटक करत मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. 2) गुरन 1049/2023 भादवि कलम 454,457,380 अन्वये नोंद असून एक आरोपीस अटक करत शंभर टक्के रिकव्हरीसह घरफोडी उघड करण्यात आली आहे. 3) गुरन 1053/2023 भा. ह. कायदा कलम 3] (1), 25 सह भादवि कलम 34 अन्वये नोंद असून दोन आरोपीस अटक करत पिस्टलसह एकुण 12.00.000/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4) गुरन 1041/2023 एन. डी. पी एस कलम 20 ब अन्वये नोंद असुन गुन्हयात दोन आरोपीस अटक करत एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 5) गुरन 753/2023 कलम भादवि 420 अन्वये नोंद असून एक आरोपी अटक करत शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आली आहे. 6) गुरन 1057/2023 कलम भादवि प्रमाणे 454,457, 380 अन्वये नोंद असून गुन्हयात दोन आरोपी अटक करत शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकुण 07 आरोपीना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो.. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे सो, सफी रघुवीर देसाई, सफी संजय देवकुळे पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
