सातारा तालुका पोलीसांनी मौजे चाळकेवाडी येथे होंडा सिटी फोर व्हीलरची काच फोडुन चोरी करणान्या चोरटयास २४ तासाचे आत पकडुन चोरीचा सर्व माल केला जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- दि.१८/१२/२०२३ रोजी सुमित प्रविणकुमार चव्हाण व अभितीज पोपट वारागडे रा. गडकर आळी, शाहुपुरी सातारा हे प्री बेडींग फोटो शुट कामी मौजे चाळकेवाडी येथे गेले असता त्यांनी रस्त्याचे बाजुला त्यांची होंडा सिटी एम.१४. डीएफ.५७०० ही पाकींग करून प्री बेडींग वेडींगचे फोटो शुट करीता गेले असता त्यावेळी अज्ञात चोरटयाचे गाडीची डाव्या बाजुची मागील काच फोडुन कॅमेरे व फोटो शुटचे साहित्य दोन बॅगसहीत लंपास केले आहे.
तरी त्यावरून सुमित प्रविणकुमार चव्हाण यांनी दिले तक्रारी वरून काल दि.१९/१२/२०२३ रोजी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरूध्द भादवि कलम-३७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घाडके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी २४ तासाचे आत अज्ञात चोरटयाचा छडा लावुन रामचंद्र तुकाराम पवार, वय-३५ वर्षे रा. मायणी ता.जावली जि. सातारा यास ताब्याम घेवुन अधिक चौकशी केली असता त्याचेकडुन बॅनगार्ड कंपनीच्या काळया बॅग्ज त्यात गोडॉक्स कंपनीचे लाईट ३०० प्रो, गोडॉक्स एक्स २ ट्रेगर व सहा मेमरी कार्ड असलेले कार्ड केस, दोन कॅमेरा चार्जर, दोन कॅमेरा बॅटरी, रोड कंपीनीचा एक माईक, निशी कंपनीचा फिल्टर, गोप्रो कॅमेरा, ५० mm sony कंपनीचा लेन्स व एक काळया रंगाचे पॉकेट त्यात दोन व चार चाकी वाहनाचे लायसन्स, आयडीबीआय, कॉसमॉस, बजाज व आरबीएल कंपनीचे एटीएम कार्ड असा एकुण २,०००००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. वरीष्ठांचे सुचनाचे प्रमाणे पोलीस हवालदार श्री वायदंडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री. समीर शेख साो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल मैडम अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांचे मार्गदर्शनानुसार तसेच मा.श्री. किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग, सातारा यांचे उपस्थितीत श्री, विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक, सातारा तालुका, श्री फार्ण सहा. पोलीस निरीक्षक, श्री.डी.ए. दळवी, पोलीस उपनिरीक्षक, तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पा.हवा. राजु शिखरे, पो.हवा, मालोजी चव्हाण, पो.हवा, धनंजय कुंभार, पो. हवा तुकारात पवार, पो. ना. महेंद्र नारनवर, पो. कॉ. डफळे यांनी सदर कारवाई केलेली आहे. सदर कारवाईचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com