सातारा पोलीसांनी सराईत गुंड हर्षल साळुंखे व जयदीप धनावडे यास २ वर्षाकरीता केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– सातारा जिल्हयातील सातारा शहर परिसरातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीतील २ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

सातारा जिल्हयामध्ये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) जयदिप सचिन धनवडे, वय २२ वर्षे, २) हर्षद संभाजी साळुंखे, वय २२ वर्षे, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता जि सातारा यांचे टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, दुखापत पोचवणे यगैरेबाबत यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीपिरुथ्य महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्ताचाची चौकशी श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा भाग सातारा यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच पाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रय होत होता, अशा टोळीयर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. परील टोळीला मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून सदर
टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्यये पूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, बाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे ३० उपद्रवी टोळयांमधील ९६ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १२७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन एमपीडीए कायदयाअंतर्गत १ इसमाचर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोकों अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट