सातारा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कुटुंबिय यांचेकरीता नेत्र तपासणी व आरोग्य शिबीर संपन्न…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : मा. पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 09/03/2023 रोजी सकाळी 10.00 ते 15.30 यावेळेत पोलीस मुख्यालयातील सर्व शाखा व मंत्रालयीन स्टाफ, सातारा विभाग, सातारा शहर. सातारा तालुका, शाहुपूरी, बोरगांव येथील पोलीस अधिकारी / अमलदार व त्यांचे कुटुंबिय यांचे करिता समता फांउडेशन यांचेवतीने मोफत नेत्र तपासणी चष्मा वाटप व आवश्यकता असल्यास मोफत डोळयाचे ऑपरेशन, तसेच रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3132 यांचेवतीने आरोग्य विषयक तपासणी शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरामध्ये नेत्रतपासणी, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, हाडांची तपासणी, त्वचा तपासणी, ईसीजी या व इतर आरोग्य विषयक तपासणी पोलीस करमणुक केंद्र सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.







सदर आरोग्य शिबीराचा लाभ 125 पोलीस अधिकारी, अंमलदार व 25 कुटुंबीयांनी घेतला. सदर शिबीरास आरोग्य क्षेत्रातील डॉ. श्री संग्राम देशमुख जनरल चेकअप आणि एमडी मेडिसीन, डॉ. श्री चैतन्य बोकिल जनरल सर्जन, डॉ रोहन पाटील व डॉ. आदित्य महाजन त्वचारोगतज्ञ, डॉ. अभिषेक महाजन. हाडांचे तज्ञ, डॉ. आशिष अग्रवाल दंतचिकिस्तक, डॉ निलम देशमुख स्त्रीरोगतज्ञ डॉ. शंकरराव गोसावी जनरल चेकअप . तसेच रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3132 चे Ro डॉ. सुनिल धुमाळ, चेअरमने रोटरी सातारा कॉप्स, Ro केतन साळे अध्यक्ष रोटरी क्लब सातारा 7 हिल्स, Ro मुकेश पटेल, अध्यक्ष रोटरी क्लव सातारा कॅम्प Ro प्रद्युम्न आगटे, प्रोजेक्ट आयोजक, Ro श्रीकांत निकम उपाध्यक्ष रोटरी डीस्ट्रीक्ट 3132 यांचे सहकार्य लाभले. अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांनी शिबीराकरीता आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सर्व डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मा. पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री डी. एस. वाळवेकर, सपोनि व स्टाफ पोलीस कल्याण विभाग, श्री बी.टी. अलदर राखीव पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com